prisoner hits kalamba jail superintendent Saam Digital
क्राईम

Kalamba Central Jail : कळंबा कारागृहात कैद्याचा तुरुंगाधिकाऱ्यावर हल्ला, कारणंही आलं समाेर

prisoner hits kalamba jail superintendent : कळंबा कारागृहातील गांजा प्रकरण, हत्यार प्रकरण, मोबाईल प्रकरणानंतर आता थेट बंदीजनाकडून अधिकाऱ्यांना मारहाणीचा प्रकार समाेर आला आहे.

Siddharth Latkar

- रणजीत माजगांवकर

कोल्हापुरातील कळंबा कारागृहात कैद्याने तुरुंग अधिकाऱ्यावर हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकरणी विवेक उर्फ सोन्या सोपान काळभोर याच्या विराेधात राजवाडा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी : कळंबा कारागृहातील बंदीजन विवेक उर्फ सोन्या सोपान काळभोर याने तुरुंग अधिकारी भारत उत्तरेश्वर पाटील यांच्यावर काठीने हल्ला चढविला. काळभाेर याने पाटील यांना लाथा देखील मारल्या.

नातेवाईकांच्या भेटीसाठी मुलाखत कक्षात घेऊन जाण्यासाठी वेळ केल्याच्या रागातून काळभोरने पाटील यांच्यावर हा हल्ला केल्याचे समजते. या मारहाण प्रकरणी विवेक काळभोर याच्यावर राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नाेंदविण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पिवळा आणि नारंगी रंगाचा मासा कधी बघितलाय का? रायगडमध्ये आढळला दुर्मिळ 'अल्बिनो एलीगेटर गार'

Maharashtra News Live Update: ठाण्यात जुन्या चाळीचा पहिला मजला कोसळला; महिला आणि दोन लहान मुले जखमी

Rajpal Yadav: राजपाल यादव पुन्हा तुरुंगात जाणार; चेक बाऊन्स प्रकरणात हाय कोर्टाचा मोठा दणका

पावसाळ्यात मिळणारी तेरडा रानभाजी खाल्ली आहे का? जाणून घ्या फायदे आणि सोपी रेसिपी

Sangli Crime: धक्कादायक! सांगलीत मालमत्तेच्या मोहामुळे नातजावयाकडून खूण...बनाव रचत सासूचा काढला काटा

SCROLL FOR NEXT