police raids kombad bazar 5 lakhs seized 11 arrested in yavatmal  Saam tv
क्राईम

Yavatmal : दिग्रस तालुक्यात कोंबड बाजारावर पाेलिसांची धाड, 5 लाख 90 हजारांचा मुद्देमाल जप्त; 11 अटकेत

Yavatmal Kombad Bazar : यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील आरंभी व शिवणी शेत शिवारात कोंबड बाजार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली हाेती.

Siddharth Latkar

- संजय राठोड

Yavatmal Crime News :

यवतमाळ जिल्ह्यात एका कोंबड बाजारावर पाेलिसांनी धाड टाकली. या कारवाईत पाेलिसांनी 5 लाख 90 हजार रुपयांच्या मुद्देमाल जप्त केला. पाेलिसांनी 11 जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Maharashtra News)

यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील आरंभी व शिवणी शेत शिवारात कोंबड बाजार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे दारव्हा येथील वरिष्ठ पाेलिस अधिकारी यांच्या पथकाने घटनास्थळी धाड टाकली.

पाेलिस आल्याने अनेकांची धांदल उडाली. पाेलिसांनी 11 जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत 5 लाख 90 हजारांचा मुद्देमाल पाेलिसांनी जप्त केला. यात लढाईच्या कोंबड्यांचं दहा दुचाकीचा समावेश आहेत. दरम्यान पोलिसांची धाड पडताच कोंबड बाजार शौकीनांनी तेथून पळ काढला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पाटणबोरीतून गांजा जप्त

यवतमाळच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (yavatmal local crime branch) रात्री पेट्रोलिंग करत असताना पाटणबोरी येथील शिवाजी चौक परिसरात एका संशयितांच्या घरी धाड टाकली. यात पोलिसांच्या हाती साडेपाच किलो गांजा हाती लागला. हा गांजा विक्रीसाठी आणणाऱ्या तस्करालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. गंगाधर पत्रीवार असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nalasopara: गटारावरील लोखंडी जाळीत महिलेचा पाय अडकला, जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल; VIDEO

Top 10 Diamonds: जगातले सर्वात मोठे TOP 10 हिरे कोणते? तुम्हाला ही माहितीये का?

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये काही पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या रांगा

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT