Pune Crime News saam tv
क्राईम

Pune: पुणे- सातारा महामार्गावर सराफ व्यावसायिकाला लुटणारी टोळी जेरबंद, पिंपरी चिंचवड पाेलीसांकडून शस्त्र जप्त

अधिक तपास पुणे ग्रामीण पोलीस करत आहेत.

Siddharth Latkar

- सचिन जाधव / गाेपाल माेटघरे

Pune News :

पुणे सातारा महामार्गावरील खेडशिवापूर हद्दीत सराफ व्यावसायिकाला लुटणारी सराईत टोळी जेरबंद पाेलीसांना यश आले आहे. दूसरीकडे पिंपरी चिंचवड पोलीसांनी चार संशयितांकडून मध्यप्रदेशातून आणलेली चार देशी कट्टे पिस्टल आणि दहा जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. (Maharashtra News)

पुणे सातारा महामार्गावरील खेडशिवापूर हद्दीत सराफ व्यावसायिकाला लुटणा-या सराईत टोळीस पुणे ग्रामीण पोलीसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या चौघा जणांच्या टोळीकडून दरोड्याची उकल झाली. याप्रकरणी एकूण ८ जणांच्या विरोधात खेडशिवापूरच्या राजगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पाेलीसांनी दिलेल्या माहितीनूसार रोहित साठे, निखिल कांबळे, निलेश झांजे, शफिक हावरी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. संशयितांकडून साडेआठ तोळा वजनाचे सोन्याचे, तीन किलोग्राम चांदीचे दागिने असा ६ लाख ५८ हजारांचे दागिने पोलीसांनी हस्तगत केलेत. अधिक तपास पुणे ग्रामीण पोलीस करत आहेत.

पिंपरी चिंचवड पोलीसांकडून शस्त्र जप्त

पिंपरी चिंचवड पोलीसांच्या गुन्हे शाखा दोन पोलीस पथकाने सांगवी भागात सापळा लावून कारवाई करत दोन संशियांकडून आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांकडून एकूण चार देशी कट्टे पिस्टल आणि दहा जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. हरीश काका भिंगारे, गणेश बाळासाहेब कोतवाल शुभम जगन्नाथ पोखरकर आणि अरविंद अशोक कांबळे या चार संशयितांकडून पोलीसांनी मुद्देमाल हस्तगत केला आहे.

हरीश काका भिंगारे याची मुळशी तालुक्यातील उरावडे आंबेगाव या ठिकाणी शेती असून त्याचं शेतीच्या वादातून स्थानिक शेतकऱ्याची भांडण झालं होतं. त्यामुळे त्यांनी इतर शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण करण्याकरिता मध्यप्रदेशच्या सीमा भागातून देशी कट्टे आणि जिवंत काडतुसे विकत आणली होती असे पोलीस तपासात उघडकीस आल्याची माहिती साम टीव्हीशी बाेलताना सतीश माने (पोलीस उपायुक्त, पुणे पिंपरी चिंचवड) यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाची जोरदार हजेरी

Shocking: भुकेनं व्याकुळ मुलानं दूध मागितलं, संतापलेल्या बापानं ४ वर्षाच्या पोराला दरवाजावर आपटलं

राज्यातील 80 लाख महिला अपात्र! ₹1500 सरकारच्या डोळ्यात खुपताय का?

पोटावरची चरबी झटक्यात उतरेल! सकाळी दुधासोबत प्या 'या' हिरव्या पानांची पावडर

Satbara Utara : कामाची बातमी! ५ मिनिटात घरबसल्या काढा सातबारा, फक्त ₹१५ होणार खर्च; पाहा 7/12 ऑनलाइन काढण्याची सोपी प्रोसेस

SCROLL FOR NEXT