police bans sanjay telnade and 7 members of st sarkar gang to enter in kolhapur  Saam Digital
क्राईम

Kolhapur: कुख्यात एस.टी. सरकार गॅंगवर माेठी कारवाई, म्हाेरक्यासह 7 जण काेल्हापुरातून हद्दपार

police bans sanjay telnade and 7 members of st sarkar gang to enter in kolhapur: विविध प्रकारचे 17 गंभीर गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात एस.टी. सरकार गॅंगला एक वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

कोल्हापूर जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी गंभीर गुन्हे दाखल असलेल्या टोळ्यांवर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. कोल्हापूर पाेलिसांनी गुंड संजय तेलनाडे याच्यासह सात जणांवर हद्दपारीचा कारवाई केली आहे. ही कारवाई इचलकरंजीच्या एस.टी. सरकार गॅंगवर झाल्याने गुन्हेगारी क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

इचलकरंजी येथील गावभाग पोलिसांनी हद्दपारीच्या सादर केलेल्या प्रस्तावाला काेल्हापूर जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी मान्यता दिली. यामध्ये एस.टी. सरकार गॅंगचा प्रमुख आणि माजी नगरसेवक संजय शंकर तेलनाडे यांच्यासह सात जणांचा समावेश आहे.

संजय तेलनाडेसह अरविंद सुकुमार मस्के, राकेश सुरेश कुंभार, दिपक सतीश कोरे, इमरान दस्तगीर कलावंत, आरिफ दस्तगीर कलावंत, अभिजीत सुभाष जामदार यांच्यावरही कारवाई झालेली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शरद पवार पुणे जिल्ह्यात करणार दुष्काळ दौरा

LPG Price Today : सणासुदीआधी महागाईचा झटका! LPG सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT