police arrests three youths in bhandara saam tv
क्राईम

Crime News: प्रेम प्रकरणातून युवकाचा खून, युवतीसह तिघांना अटक

प्रेम प्रकरणातून नयनचा खून झाल्याची बाब समोर आली आहे अशी माहिती साम टीव्हीशी बाेलताना पाेलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी दिली.

Siddharth Latkar

- शुभम देशमुख

Bhandara Crime News :

भंडारा (bhandara) जिल्ह्यात युवकाच्या खून प्रकरणी तिघांना पाेलीसांनी अटक केली आहे. प्रेम प्रकरणातून युवकाचा (youth) खून झाल्याचे पाेलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचा पाेलीस (bhandara police) सखाेल तपास करीत आहेत. (Maharashtra News)

पाेलीसांनी दिलेल्या माहितीनूसार तीन दिवसांपूर्वी रात्री दहाच्या सुमारास नयन मुकेश खोडके (nayan mukesh khodke) हा १९ वर्षीय युवक घरी न सांगता निघून गेला होता. ३० नोव्हेंबरला कोरंभी-सालेबर्डी नाल्यात संशयितरीत्या ताे मृतावस्थेत पाेलीसांना आढळला.

या घटनेनंतर पाेलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी विविध ठिकाणी तपासाची पथके फिरवली. त्यानंतर पाेलीसांनी एका दिवसातच संशयिताचा छडा लावला. हा खून प्रेम प्रकरणातून झाल्याचे पाेलीस तपासात निष्पन्न झाल्याची माहिती समाेर आली आहे.

पाेलीसांनी दिलेल्या माहितीनूसार याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेत त्यांना अटक केली. मंथन अशोक ठाकरे (वय १९, राहणार भोजापूर), साहिल शरद धांडे (१९, राहणार ठाणा पेट्रोल पंप), पूनम नरेंद्र कारेमोरे (१९, राहणार बीड, सीतेपार) अशी संशयितांची नावे आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या तिघांनीही संगनमत करून नयनला सालेबर्डी-कोरंभी मार्गाने नेले. घटनास्थळी नयनचे हातपाय बांधून गळफास लावला. त्यानंतर नयनला नाल्यात फेकून दिले. प्रेम प्रकरणातून नयनचा खून झाल्याची बाब समोर आली आहे अशी माहिती साम टीव्हीशी बाेलताना पाेलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain : राज्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाने सांगितला शब्द ना शब्द

Famous Cardiologist: प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टरची आत्महत्या; कारमध्ये आढळला मृतदेह

Thursday Horoscope : पैशाच्या समस्या दूर होतील, ५ राशींच्या व्यक्तींचे कामात बढतीचे योग; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Maharashtra Politics : मोठी बातमी! महाराष्ट्रातील ६४ नगरसेवकांवर कारवाई; ३ वर्षांसाठी अपात्र, कारण काय?

Maharashtra News Live Update: अमृत 2.0 योजनेअंतर्गत उल्हासनगरसाठी २११.०६ कोटींच्या स्वतंत्र पाणी योजनेला मंजुरी

SCROLL FOR NEXT