Pune Pimpri Chinchwad Crime News Saam Tv
क्राईम

Pune : 'मी महाराष्ट्र सोडून जाईन...', फेसबुक लाईव्ह करत परप्रांतीय तरुणाची आत्महत्या; धक्कादायक कारण आलं समोर, Video व्हायरल

Pune Pimpri Chinchwad Crime News : पिंपरी-चिंचवडमध्ये बायको सोडून गेली म्हणून फेसबुक लाईव्ह करत एका परप्रांतीय तरुणाने आत्महत्या करत आपले जीवन संपवले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Alisha Khedekar

  • पिंपरी-चिंचवडमध्ये फेसबुक लाईव्ह करत तरुणाची आत्महत्या

  • मृत तरुण परप्रांतीय असून बायको सोडून गेल्याने नैराश्येत होता

  • पोलिसांकडून सखोल तपास सुरू

पुण्यातील पिंपरी चिंचवडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका परप्रांतीय तरुणाने भाजी मंडईच्या बिल्डिंग वर उभा राहून फेसबुक लाईव्ह करत उडी मारली आणि जीवनाचा दोर कापला. धक्कादायक म्हणजे या तरुणाने पत्नी सोडून गेल्याच्या नैराश्येतून आत्महत्या केली. तरुणाने केलेल्या फेसबुक लाईव्हमध्ये मला माझी बायको हवी आहे. मला तिला एकदा भेटायचं असल्याचं त्याने म्हटलं आहे. या प्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत असून परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केसरी प्रसाद शाहू असं आत्महत्या केलेल्या परप्रांतीय तरुणाचं नाव आहे. काल दुपारच्या सुमारास पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी येथील महानगरपालिकेच्या रुग्णालय शेजारील असलेल्या भाजी मंडईच्या बिल्डिंग वर केसरी हा परप्रांतीय तरुण मध्य प्रश्न करून उभा होता. त्याने फेसबुक लाईव्ह करत आपली बायको सोडून गेली असल्याचं सांगितलं. शिवाय याचं कारणामुळे तो आत्महत्या करत असल्याचंही त्याने म्हटलं.

फेसबुक लाईव्हवर व्यथा मांडत त्याने बिल्डिंगवरून उडी मारतं आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी केलेल्या व्हिडिओमध्ये त्याची शेवटची इच्छा त्याला त्याच्या बायकोला भेटण्याची होती. मात्र ती त्याला सोडून गेल्याने तो बेचैन होता. केशरी प्रसाद शाहू हा मूळचा मध्यप्रदेश जिल्ह्यातील रहिवाशी होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोचले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला असून पुढील तपास सुरु केला आहे.

https://www.facebook.com/share/v/14UX9QC9eJ6/

केसरी फेसबुक लाईव्ह दरम्यान काय बोलला?

माझं कोणी ऐकत नाही. मी काय करू? तुम्हीच सांगा. माझी एकच चुकी आहे. पण मला एकच गोष्ट हवी आहे. माझी बायको मला सोडून गेली आहे. मला तिला एकदा भेटायचं आहे. मी इथून निघून जाईन. महाराष्ट्र सोडून जाईन. पुन्हा येणार नाही. मी खूप टेन्शनमध्ये आहे, मी आत्महत्या करत आहे. मी स्वतःला कंटाळलो आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मी अवतारी, तू मागील जन्माची अप्सरा'; लग्नाचं आमिष दाखवत महिलेचं लैंगिक शोषण; अशोक खरातविरुद्ध तिसरा गुन्हा दाखल

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातल्या ज्योतिबा मंदिरातील 15 ते 20 पुजाऱ्यांकडून दोन भाविकांना लाथा बुक्क्यांनी मारहाण

लांडगा-कुत्र्याचं मिलन धोकादायक, संकरातून हिंस्त्र पिल्लांचा जन्म, महिलेवरच्या हल्ल्यानंतर वनविभागाला जाग?

महाराष्ट्रातील भाजपचा अनुभवी चेहरा हरपला! देशाच्या राजकारणात हळहळ

Maharashtra Kesari : हर्षवर्धन सदगीर डबल महाराष्ट्र केसरी, फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान

SCROLL FOR NEXT