Pimpri Chinchwad Crime: Saam tv
क्राईम

Crime News: भयंकर! दारुचा ग्लास उष्टा केल्याचा राग आला, स्क्रू ड्रायव्हरने वार करुन एकाला संपवलं; पिंपरी चिंचवडमधील घटना

Pimpri Chinchwad Crime: प्रकरणात चिंचवड पोलिसांनी सिसिटीवी फुटेजच्या आधारे फक्त बारा तासाच्या आत यशवंत बागडे या आरोपीचा बेड्या ठोकल्या आहेत.

गोपाल मोटघरे

पिंपरी चिंचवड, ता. ८ ऑक्टोबर

पिंपरी चिंचवडमध्ये चिंचवड जकात नाका येथे परवा रात्री अमीर मकबूल खान या इसमावर एका अज्ञात व्यक्तीनी स्क्रू ड्रायव्हरने वार करून खून केला होता. या भयंकर हत्येने परिसरात एकच खळबळ उडाली होती. इतक्या निर्घृणपणे हत्या का केली असावी? याबाबतचा तपास पोलीस करत होते. या तपासामध्ये आता एक धक्कादायक बाब समोर आली आहे. दारू पिण्याच्या ग्लास उष्टा केला म्हणून ही भयकंर हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दारू पिण्याचा ग्लास उष्टा केला म्हणुन यशवंत आत्माराम बागडे या दारुड्या व्यक्तीने अमीर मकबूल खान या दारु पिणाऱ्या व्यक्तीचा स्क्रू ड्रायव्हरने भोसकून खून केल्याचा पोलिस तपासात उघडकीस आले आहे. या प्रकरणात चिंचवड पोलीसांनी सिसिटीवी फुटेजच्या आधारे फक्त बारा तासाच्या आत यशवंत बागडे या आरोपीचा बेड्या ठोकल्या आहेत.

अमीर मकबूल खान आणि यशवंत बागडे हे चिंचवड जकात नाका समोरील विजय बिअर बारच्या समोर दारू पित बसले होते. त्यादरम्यान यशवंत बागडे यांने अमीर मकबूल खान यांचां दारू पिण्याचा ग्लास एका व्यक्तीला प्यायला दिला. त्यामुळे संतापलेल्या अमीर मकबूल खानने यशवंत बागडेला मारहाण करण्यास सुरुवात केली.

त्यादरम्यान, यशवंत बागडे यांने अमीर मकबूल खान या मयत व्यक्तीवर स्क्रू ड्रायव्हरने वार करत त्याचा खून केला होता. आमिर मकबूल खान चा खून केल्या नंतर यशवंत बागडे हा फरार झाला होता. मात्र चिंचवड पोलिसांनी फक्त 12 तासाच्या आत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Egg Safety Facts: अंडे का फंडा! अंडी फ्रिजमध्ये ठेवावीत की नाही?

Maharashtra Live News Update: आगामी निवडणुकी साठी महायुतीची बैठक.

Nashik : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेने आयुष्य संपवलं; माहेरच्या लोकांकडून घरासमोर पार्थिवावर अंत्यविधी

Soham Bandekar Marriage: लाडक्या आदेश भाऊजींच्या घरी लगीनघाई! होणारी सुनबाई आहे तरी कोण?

Nagpur Politics : ठाकरेंना मोठा झटका, १२ वर्षे शिवसेनेत काम केलेल्या तरूण नेत्याचा राजीनामा, २ कारणंही सांगितली

SCROLL FOR NEXT