Pimpari Chinchwad Crime Saam Tv
क्राईम

Crime: बायकोला बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत पाहिलं, संतापलेल्या नवऱ्याने दोघांना जागीच संपवलं

Pimpari Chinchwad Crime News: पिंपरी-चिंचवडमध्ये भयंकर घडना घडली. नवऱ्याने बायकोची आणि तिच्या बॉयफ्रेंडची निर्घृण हत्या केली. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

Priya More

पिंपरी चिंचवडमध्ये एक महिला आणि तिच्या बॉयफ्रेंडची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. पिंपरी-चिंचवडमधील देहू रोडवरील तळवडेमध्ये ही भयंकर घटना घडली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना धक्कादायक माहिती समोर आली आहे. या महिलेच्या पतीनेच तिची आणि तिच्या बॉयफ्रेंडची हत्या केली. अनैतिक संबंधातून ही घटना घडली. या महिलेच्या नवऱ्याने तिला आणि तिच्या बॉयफ्रेंडला नको त्या अवस्थेत पाहिले होते. रागाच्या भरात त्याने रस्त्यावरील दगडाने दोघांची ठेचून हत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, जगन्नाथ पुंडलिक सरोदे (वय ५६ वर्षे) आणि मंगला सूरज टेंबरे (वय ३० वर्षे) अशी हत्या करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत. दत्तात्रय लक्ष्मण साबळेने (वय ४९ वर्षे) या दोघांची हत्या केली. दत्तात्रय साबळे हा मंगलाचा दुसरा नवरा होता. मंगलाचे जगन्नाथ सरोदेसोबत अनैतिक संबंध होते. जगन्नाथ सरोदे हा मजुरीचे काम करत होता. तर महिलेचा नवरा दत्तात्रय साबळे हा लेबर कॉन्ट्रॅक्टर आहे. जगन्नाथ आणि मंगलाच्या प्रेमप्रकरणाविषयी दत्तात्रयला कळाले होते.

जगन्नाथ सरोदे आणि मंगला टेंबरे या दोघांना दत्तात्रयने नको त्या अवस्थेत पाहिले. त्यामुळे संतप्त झालेल्या दत्तात्रयने सिमेंटच्या ब्लॉकने ठेचून दोघांची निर्घृण हत्या केली. मध्य रात्री एक ते दोन वाजताच्या सुमारास ही घटना घडली होती. हत्या केल्यानंतर आरोपी दत्तात्रय फरार झाला होता. देहूरोड पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगला साबळेचा दत्तात्रयसोबतचा दुसरा विवाह होता. तिचे आधी लग्न झाले होते. पहिल्या नवऱ्यापासून तिला दोन मुलं होती. पण पहिल्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर तिने दत्तात्रयसोबत दुसरे लग्न केले होते. पण तिचे जगन्नाथ सरोदे यांच्यासोबत विवाहबाह्यसंबंध होते. दोघेही एकाच परिसरात राहत होते. त्यांच्या नेहमी भेटीगाठी सुरू होत्या. मंगळवारी रात्री मंगलाच्या नवऱ्याने तिला आणि तिच्या बॉयफ्रेंडला एकत्र नको त्या अवस्थेत पाहिले. त्यानंतर दत्तात्रयने दोघांना संपवलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT