Crime news Saam Tv
क्राईम

Crime News : प्रसिद्ध मॉलमध्ये सुरक्षा रक्षक महिलेवर बळजबरी; IT कर्मचाऱ्याला बेड्या, काय आहे संपूर्ण प्रकार?

Pimpari-Chinchwad : पिंपरी चिंचवडच्या वाकड फिनिक्स मिलेनियम मॉलमध्ये IT कर्मचाऱ्याने महिला सुरक्षा रक्षकावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना घडली. पीडितेच्या तक्रारीवरून वाकड पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Alisha Khedekar

  • फिनिक्स मिलेनियम मॉलमध्ये महिला सुरक्षा रक्षकावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न.

  • आरोपी मनोज कदम मॉलमध्ये ऑपरेशन मॅनेजर पदावर कार्यरत होता.

  • पीडित महिलेच्या तक्रारीवरून वाकड पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.

  • पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या

पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवडमधील वाकड येथील फिनिक्स मिलेनियम मॉलमध्ये काही दिवसांपूर्वी एक संतापजनक घटना घडली. मॉलमधील सुरक्षा रक्षक महिलेवर मनोज धोंडीराम कदम या आयटी कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. प्रोमोशनची भूलथाप देत त्यानं महिलेवर जबरदस्ती केली. या प्रकरणी महिलेनं वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी या नराधमाच्या मुसक्या आवळल्या आहेत.

फिनिक्स मिलेनियम मॉलमध्ये महिला खासगी कंपनीत सुरक्षा रक्षक या पदावर कार्यरत होती. तर, मनोज धोंडीराम कदम असे आरोपीचे नाव असून मॉलच्या मॅनेजर ऑपरेशन पदावर कार्यरत होता. पीडित महिलेनं तक्रारीत म्हटल्यानुसार, पीडित महिला आणि आरोपीची मॉलमध्येच ओळख झाली. मात्र, नंतर आरोपीनं महिलेसोबत अश्लील वर्तन केले. शिवाय पीडितेला त्याने एक ऑफर दिली. 'तुला कोणती पोस्टिंग हवी आहे, मला सांग', असं म्हणत त्यानं महिलेसोबत अश्लील वर्तवणुक करून बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.

महिलेच्या इच्छेविरोधात लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी पीडित महिलेनं वाकड पोलीस ठाण्यात धाव घेतली. घडलेली सगळी हकीकत पोलिसांना सांगितली. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली. तसेच आरोपी कर्मचारी कदम यांच्याविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

गुन्हा दाखल केल्याच्या काही दिवसातच पोलिसांनी आरोपी कदम याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्यावर वाकड पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 74, 351 (2), 351 (3) कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती वाकड विभागाचे पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांनी दिलेली आहे. दरम्यान या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईतील High Five सोसायटीत मोलकरणीनं आयुष्य संपवलं; घरकाम करणाऱ्या घरातच आयुष्याचा दोर कापला

Jewellery Cleaning : सोन्याच्या दागिन्यांची चमक कमी झालीय? मग २ मिनिटांत करा 'हा' उपाय

Maharashtra Live News Update: मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुन्हा एकदा खडाजंगी

Salman Khan: 'कुछ हासिल करने के लिए...'; भाईजानने केलं जबरदरस्त ट्रान्सफॉर्मेशन, 'तो' फोटो होताय व्हायरल

Navi Mumbai : थायलंडचा हायड्रो गांजा नवी मुंबईत विकायचा, भाजप नेत्याच्या मुलाच्या मुसक्या आवळल्या

SCROLL FOR NEXT