Baramati Crime News Saam Tv
क्राईम

Crime: लग्नाला नकार दिल्याचा राग तरुणीच्या डोक्यात गेला, बॉयफ्रेंडच्या डोक्यात रॉड घालून जागीच संपवलं

Patana Crime: बिहारच्या पाटणामध्ये तरुणीने बॉयफ्रेंडची हत्या केली. लग्नाला नकार दिल्याच्या रागातून हे हत्याकांड घडलं. या प्रकरणी तरुणीला पोलिसांनी अटक केली. या घटनेमुळे बिहारमध्ये खळबळ उडाली आहे.

Priya More

बिहारच्या पाटणामध्ये हत्याकांडाची भयंकर घटना समोर आली आहे. लग्नाला नकार दिल्यामुळे संतप्त झालेल्या तरुणीने प्रियकराची हत्या केली. डोक्यामध्ये रॉडने वार करत तरुणीने प्रियकराचा जीव घेतला. ही घटना कंकरबाग पोलिस स्टेशन परिसरातील चिरैयतांड भागात शनिवारी रात्री उशिरा घडली. टीपीएस कॉलेजजवळ राहणाऱ्या पूजा नावाच्या तरुणीने तिचा प्रियकर मुरारीच्या डोक्यात रॉडने वार करून त्याची हत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.

हत्या करण्यात आलेला तरुण मुरारी कुमार हा मोकामा येथील मोर पश्चिम पंचायतीच्या वॉर्ड क्रमांक ४ चा रहिवासी होता. तर पूजा नावाची तरुणी गौरीचकची रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. पूजा आणि मुरारी यांचे गेल्या अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. परंतू मुरारी तिच्याशी लग्न करण्यास सतत नकार देत होता. याचा राग येऊन पूजाने मुरारीच्या डोक्यावर रॉडने वार केले. ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर पूजाने पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच कंकरबाग पोलिस ठाण्यातील पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मुरारीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला नंतर कुटुंबीयांकडे दिला. तर पोलिसांनी आरोपी पूजाविरोधात गुन्हा दाखल करत तिला अटक केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन एफएसएल टीमनेही घटनास्थळी पोहोचून पुरावे गोळा केले.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंब आणि समाजाच्या दबावामुळे मुरारी लग्न टाळत होता. ज्यामुळे पूजा संतप्त झाली. अखेर तिने रागाच्या भरात मुरारीचा जीव घेतला. कंकरबाग पोलिस ठाण्याच्या प्रभारींनी सांगितले की आरोपी तरुणीला अटक करण्यात आली आहे. पूजा महिला टीपीएस कॉलेजजवळील एका खोलीत राहत होती. जिथे मुरारी तिला भेटायला येत असे. घटनेपूर्वी तरुणी आणि मुरारीचे कडाक्याचे भांडण झाले. या भांडणानंतर हे हत्याकांड घडले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Pune Expressway Missing Link: मुंबई- पुणे कनेक्टिव्हिटी बिघडली; एक्सप्रेसवेवर कोंडी नियोजनचं 'मिसिंग'

LPG Cylinder: महागाईच्या झळा, सामान्यांना 'कळा'! व्यावसायिक सिलेंडर 993 रुपयांनी महागला; खाद्यपदार्थांच्या किंमती वाढणार?

Pune Crime: गुरांच्या गोठ्यात ४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, लैंगिक अत्याचारानंतर चिमुरडीची हत्या

Mumbai Pune Missing Link : 'मिसिंग लिंक'ला विरोध; लोणावळ्यातून प्रवेश देण्याची मनसेची मागणी

Ladki Bahin Yojana: राज्यातील १ कोटी ८९ लाख लाडक्या बहिणी पात्र; ५४ लाख बहिणींना नाही मिळणार १५०० रुपये

SCROLL FOR NEXT