parbhani lcb arrests three in hanuman mandir theft case Saam TV
क्राईम

Parbhani Crime News : श्री हनुमान मंदिरात चोरी, परभणीत तिघांना अटक

हा सर्व मुद्देमाल पोलिसांच्या पथकाने हस्तगत केला आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात हा संशयित आरोपी यापूर्वीदेखील जबरी चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे समोर आले आहे.

राजेश काटकर

Parbhani :

परभणी शहरातील लोकमान्यनगर भागातील श्री हनुमान मंदिरात चोरी झाली. या घटनेत सोन्याचे दागिने, चांदीची गदा चोरट्याने लंपास केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चाेरट्यांना अवघ्या ४ तासांत जेरबंद केले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

परभणी स्थानिक गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनूसार विवेक ऊर्फ पवन घनेश्वर साळवे (वय १९) याच्यासह इतर दोघे (रा. हडको, परभणी) यांना ताब्यात घेतले. या संशयितांकडून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

यामध्ये चांदीची गदा, सोन्याचे दागिने, एक अॅम्प्लिफायर तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण ९१ हजार रुपयांचा मुद्देमालाचा समावेश आहे. हा सर्व मुद्देमाल पोलिसांच्या पथकाने हस्तगत केला आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात हा संशयित आरोपी यापूर्वीदेखील जबरी चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे समोर आले आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे आणि सरकार मधील कोंडी उपोषणाच्या 12 व्या दिवशीही कायम

Bigg Boss 20 : पहिल्या आठवड्यात नॉमिनेट झाले 'हे' स्पर्धक; घराला कोण करणार टाटा-बाय बाय? खेळाची रंगत वाढतेय

Ladki Bahin Yojana: 'या' महिलांच्या खात्यात जमा होणार ऑगस्टचे ₹१५००; यांचे पैसे कायमचे होणार बंद, पाहा महत्त्वाची अपडेट

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

SCROLL FOR NEXT