Parbhani Crime News Saam TV
क्राईम

Parbhani Accident News : कामासाठी घराबाहेर पडला अन् वाटेतच घात झाला...; दुचाकी-ट्रक अपघातात एक जण जागीच ठार

Parbhani : अपघाताची घटना घडली तेव्हा देखील ते बांगड्या विक्रीसाठी परभणी येथून मानवत रस्त्याने जात होते. यावेळी त्यांच्या दुचाकीला ट्रक चालकाने जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झालाय.

Ruchika Jadhav

Accident News :

परभणीमधून अपघाताची एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झालाय. परभणीतील राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हापाटी येथे ही घटना घडली आहे.

अपघातत मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव शेख मस्जिद शेख मैनोद्दीन मनियार (वय 42 वर्ष) असं आहे. ते परभणीच्या संजय गांधी नगर येथील रहिवासी होती. पोटाची खळगी भरण्यासाठी ते बांगड्या विक्रिचा व्यवसाय करत होते.

अपघाताची घटना घडली तेव्हा देखील ते बांगड्या विक्रीसाठी परभणी येथून मानवत रस्त्याने जात होते. यावेळी त्यांच्या दुचाकीला ट्रक चालकाने जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झालाय. सदर अपघात इतका भीषण होता की दुचाकीवरून शेख जोरात हवेत फेकले गेले. यामध्ये त्यांना गंभीर इजा झाली.

तसेच या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेनंतर रस्त्यावरील अन्य नागरिकांनी घोळका केला. तसेच ट्रकचालकाला पकडून ठेवले. काहींनी डॉक्टरांना कॉल केला तर काहींनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि रुग्णवाहीकेने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ऑपरेशन लोटसमध्ये शिंदेंचे 35 आमदार फुटणार? भाजपकडून शिंदेंची कोंडी?

शिवसेनेचे एबी फॉर्म राष्ट्रवादीच्या आमदाराकडे; नगराध्यक्ष आणि वीस ते पंचवीस उमेदवारांना अपक्ष लढावं लागलं

Delhi Blast: बॉम्ब स्फोटप्रकरणी तपास यंत्रणेला मोठं यश; पुलवामा येथून इलेक्ट्रिशियन तुफैलला अटक

Maharashtra Politics : ठाकरेंच्या जागेवर शिंदे-मनसे लढत; उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात मशाल पेटणार, इंजिन धावणार!

Beed Politics : 'मुंडे प्रचाराला आल्यास विपरित घडेल'; बीडमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीत धुसफूस?

SCROLL FOR NEXT