Wife killed husband  Saam tv
क्राईम

Husband kills wife: बायको सतत चॅट करायची, संतापून पतीने केली हत्या; व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसमुळे हत्येचं गूढ उकललं

Maharashtra crime news: पंढरपूरमध्ये सोशल मीडियावर चॅटिंगच्या संशयातून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या मदतीने गुन्हा उघड केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

पंढरपूरमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोशल मीडियावर पत्नी सतत चॅट करत असल्याच्या संशयावरून पतीनेच तिची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या सरवदे ही महिला बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली होती. त्याच दिवशी एका अनोळखी महिलेचा मृतदेह सापडल्याचीही नोंद झाली होती. सुरुवातीला या दोन घटना वेगळ्या असल्याचं वाटत होतं. मात्र पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर या दोन्ही घटना एकमेकांशी संबंधित असल्याचं समोर आलं. बेपत्ता झालेली ऐश्वर्याच मृत अवस्थेत असल्याचं निष्पन्न झालं.

पोलिसांनी कारणांचा सखोल तपास केला

या दोन्ही घटना एकच असल्याचं समजताच खरा ट्विस्ट समोर आला. यानंतर पोलिसांनी ऐश्वर्याच्या मृत्यूच्या सर्व कारणांचा सखोल तपास करण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिसांनी इंस्टाग्राम, फेसबुक तसेच व्हॉट्सॲप स्टेटस ॲक्टिव्हिटी तपासली. यावेळी तिचे स्टेटस आणि चॅटिंग यावरून काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. मोबाईल लोकेशनच्या आधारेही पोलिसांनी तपासाची दिशा ठरवली.

पंढरपूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी सांगितलं की, "१२ मार्च रोजी पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये एक महिला बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली होती. त्याच दिवशी पंढरपूरच्या ग्रामीण हद्दीखाली एका पुलाखाली महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याची माहिती मिळाली. त्यावेळी आम्हाला या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही लिंक सापडली नाही."

पोलिसांनी पुढे सांगितलं की, "मात्र महिन्याभरानंतर बेपत्ता झालेल्या महिलेची मैत्रिण आणि नातेवाईकांकडे चौकशी केली असता त्यांनी महिलेच्या दागिन्यांबाबत माहिती दिली. त्यानंतर मृतदेहाची तपासणी केली असता हाच त्याच महिलेचा मृतदेह असल्याचं लक्षात आलं."

पतीने अखेर गुन्ह्याची कबुली दिली

तपास पुढे जात असताना पोलिसांनी ऐश्वर्याचा पती हरी सरवदे याच्याकडे चौकशी केली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली. मात्र पोलिसांनी पुरावे समोर ठेवताच तो गोंधळला आणि अखेर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. ऐश्वर्या सोशल मीडियावर सतत कोणाशीतरी चॅट करत असल्याचा त्याला संशय होता. याच संशयातून त्याच्या मनात राग साचत गेला. अखेर संतापाच्या भरात त्याने तिची हत्या केल्याचं समोर आलं.

या प्रकरणात चारित्र्यावर संशय घेतल्यामुळे हा गुन्हा घडल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडिया आणि मोबाईल तांत्रिक तपासाच्या मदतीने हा गुन्हा उघडकीस आणण्यात आला. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Tourism: महाराष्ट्रातील ही ५ मंदिरं जी तुम्ही पाहिलीच पाहिजेत!

'ही' एक गोष्ट तुमचे केस लांब आणि चमकदार बनवेल

Maharashtra News Live Update: पुण्यात ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली बनावट कॉल सेंटर उद्ध्वस्त

तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा राज्यभरात धडाका; शिर्डीनंतर शेगावच्या प्रसिद्ध कचोरी सेंटरवर FDAचा छापा

Supreme Court : अपघातात मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबीयांना मिळणार ६३ लाख आणि ७.५ टक्के व्याजाने भरपाई; सुप्रीम कोर्टाचा आदेश

SCROLL FOR NEXT