Pandharpur Crime News Saam Tv
क्राईम

Shocking : अनैतिक संबंधांत सासूचा अडथळा, सूनेनं विषप्रयोग केला पण फसला; नवऱ्याचाच गेला जीव

Pandharpur Crime News : पंढरपूर तालुक्यात पत्नीने प्रियकराच्या मदतीने सासूला विष देण्याचा कट रचला; मात्र विषारी पाणी पिल्याने पतीचा मृत्यू झाला. पोलिसांनी पत्नी आणि प्रियकराला अटक करून तपास सुरू केला आहे.

Alisha Khedekar

  • महिलेने प्रियकराच्या मदतीने सासूला विष देण्याचा कट रचला

  • विषारी पाणी पिल्याने पतीचा दुर्दैवी मृत्यू

  • गावातील अनैतिक संबंधातून गुन्हा उघड

  • पोलिसांनी दोघांना अटक करून तपास सुरू केला

पंढरपूरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पत्नीने प्रियकराच्या मदतीने सासूला विष पाजून मारण्याचा कट रचला. परंतु यात तिच्या पतीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव येथे घडली आहे. या प्रकरणी मयताची पत्नी सारिका लोहार आणि तिचा प्रियकर शेखर चंदनशिवे यांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत समोनाथ लोहार यांची पत्नी सारिका आणि त्याच गावातील शेखर चंदनशिवे यांच्यामध्ये अनैतिक प्रेमसंबंध होते. त्यांच्या या प्रेम संबंधाला सासूचा विरोध होता. अनैतिक प्रेमसंबंधाला अडसर ठरणाऱ्या सासूला पाण्यात विष टाकून मारण्याचा कट रचल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. १० जानेवारी २०२६ रोजी सकाळी सातच्या वाजण्याच्या सुमारास प्रियखर शेखर याने प्रियसी सारिकाला शेतात बोलावून घेवून तिच्याकडे पांढरे रंगाचे विषारी औषध असलेली एक अर्धवट भरलेली बिस्लरीची बाटली दिली. आपल्या दोघांच्या प्रेमसंबधाला आड येणाऱ्या तुझ्या सासूच्या पिण्याचे पाणी असलेल्या कळशीत हे औषध ओत म्हणजे ती मरुण जाईल, असे सांगितले.

त्यानुसार सारिकाने रात्री आठच्या सुमारास घरात कोणीही नसताना सासुने पिण्यासाठी पाणी भरून ठेवलेल्या कळशीत बाटलीतील विषारी औषध टाकले. त्यानंतर सासूने कळशीतील पाणी तांब्यात घेवून पिले त्यावेळी तीला पाण्याची चव कडू लागली. म्हणून तो पाण्याचा तांब्या मुलगा समाधान जवळ ठेवून गेली. त्याच तांब्यातील पाणी समाधान याने जेवण केल्यानंतर पिले.

त्यानंतर समाधानला रात्री साडे अकराच्या वाजण्याच्या सुमारास उलट्याचा त्रास होवु लागला म्हणून उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान समाधानचा १६ जानेवारीला मृत्यू झाला. या घटनेनंतरही पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नव्हती. लोहार समाजाने पोलिस ठाण्यावर मोर्चा काढल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. पोलिस कारवाईनंतर पत्नीने सासूवर विष प्रयोग करून जीवे मारण्याचा कट रचल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी याप्रकरणी मृत समोनाथ लोहार यांची पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक करून पुढील तपास सुरु केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : पालघरमध्ये भूकंपाच्या पार्श्वभूमीवर NDRFचे जनजागृती प्रशिक्षण

Petrol and Diesel Prices : पेट्रोल-डिझेल अचानक महागले; या राज्य सरकारने लावला 'विशेष सेस', नवी दरवाढ लागू

Tea Affect On Digestion System: चहा प्यायल्याने पचनक्रियेवर काय परिणाम होतो? जाणून घ्या ‘हे’ 5 महत्त्वाचे फायदे- तोटे

Daulatabad Fort : इतिहासातील सर्वात मजबूत किल्ल्यांपैकी एक! दौलताबादच्या अभेद्य संरक्षण रचनेचं रहस्य वाचून थक्क व्हाल

Eggs and cholesterol: अंडं खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं का? जाणून घ्या कोणत्या व्यक्तींनी अंडं खावं पूर्णपणे टाळावं?

SCROLL FOR NEXT