Crime News Saam Tv
क्राईम

Palghar Crime News: चाललंय काय? वसईनंतर विरार हादरलं! जावयाने धारदार शस्त्राने केली सासूची हत्या

Son In Law Killed Mother In Law In Virar: विरारमध्ये जावयाने सासूची हत्या केल्याची घटना घडली आहे. पत्नी पत्नीच्या भांडणात सासूचा मृत्यू झालाय.

Rohini Gudaghe

महेंद्र वानखेडे, साम टीव्ही विरार

वसईमध्ये प्रियकराने प्रेयसीची भररस्त्यात हत्या केली. या घटनेला २४ तास उलटले नाही तेच विरारमध्ये जावयाने सासूची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना समोर आलीय. वसई-विरारमधील या हत्येच्या घटनांनी एकच खळबळ उडाली आहे. कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

विरारमध्ये (Virar) जावयाने सासूची हत्या केलीय. पती पत्नीच्या भांडणात सासूचा बळी गेलाय. साईनाथनगर येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. विरारमध्ये कौटुंबिक वादातून जावयाने सासूची हत्या केल्याचा धक्कादायक घटना घडली (Palghar Crime News) आहे. लक्ष्मी हरी कांबे (वय ६०) असं मयत सासूचं नाव असून आहे. तर प्रंशात खैरे ( वय ४०) असं आरोपी जावयाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे पत्नीसोबत अनेक महिन्यांपासून कौटुंबिक वाद सूरू होते. त्यामुळे पत्नी तिच्या मुलांसोबत विरार येथे तिच्या आईसोबत राहत (Son In Law Killed Mother In Law) होती. बुधवारी आरोपीचे पत्नी सोबत भररस्त्यात जोरदार भांडण झाले होते. त्यानंतर पत्नी कामावर गेल्यानंतर आरोपीने साईनाथ नगर येथील सासूच्या घरी जाऊन तिच्याशी वाद घातला.

या वादात लहान मुलांसमोर किचनमधील चाकूच्या साहाय्याने त्याने सासूवर वार करत तिची हत्या (Crime News) केली. हत्या केल्यानंतर आरोपी तेथेच बसून राहिला. आजूबाजूच्या नागरिकांनी या घटनेची माहिती विरार पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे विरारमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. वसईमध्ये झालेल्या हत्येच्या घटनेनंतर २४ तासांतच ही घटना समोर आलीय. त्यामुळे शहरात चाललंय तरी काय? असा प्रश्न निर्माण होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 Live News: आज किती खेळाडूंचं नशीब चमकणार; कोणावर लागणार कोटींची बोली?

Health In Winter: कॉफी प्यायची की चहा? हिवाळ्यात आरोग्यासाठी कोणते पेय फायदेशीर आहे, जाणून घ्या...

Vijaykumar Deshmukh News : भाजप कार्यकर्ता म्हणून काम करायचंय, विजायकुमार देशमुखांची मोठी प्रतिक्रिया | Video

Maharashtra News Live Updates: राज ठाकरे पुढील २ ते ३ दिवसांत पुणे दौऱ्यावर जाण्याची शक्यता

Travel In Winter: नोव्हेंबरमध्ये बर्फवृष्टी पाहायची आहे का? भारतातील या ठिकाणांना नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT