Crime News  Saam TV
क्राईम

Palghar Crime: घरावर दरोडा टाकून २ लाख १२ हजारांचा ऐवज लंपास, सात महिन्यांनी आरोपी गजाआड; कसे अडकले पोलिसांच्या जाळ्यात?

Palghar News: पालघर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून चार आरोपींना अटक केली असून हे चारही आरोपी मूळचे उत्तर प्रदेशातील असल्याच समोर आले आहे.

रुपेश पाटील

Palghar Crime News:

सात महिन्यांपूर्वी पालघर जिल्ह्यातील बोईसरच्या सरावली परिसरात घरावर दरोडा टाकून तब्बल दोन लाख १२ हजारांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास करत चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

सात महिन्यांपूर्वी बोईसरमधील शादावल इंप्रेशन या इमारतीत घरावर दरोडा टाकून बेडरूममधील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा तब्बल दोन लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता. या घटनेचा भादवी कलम 454, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यानंतर पालघर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून चार आरोपींना अटक केली असून हे चारही आरोपी मूळचे उत्तर प्रदेशातील असल्याच समोर आले आहे. याच आरोपींनी मागील काही काळात साउथ दिल्ली येथे वाहन चोरी केल्या प्रकरणात त्यांच्यावर दिल्लीत गुन्हा दाखल झाला असून हेच चोरी केलेले वाहन त्यांनी बोईसर येथे घरफोडी करताना वापरल्याचेही समोर आले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मोहम्मद शकीब मोहम्मद शौकत अन्सारी, मोहम्मद उमर महफूज अहमद, फर्मान महमद मुज्जमिल अहमद आणि मोहम्मद दानिश मोहम्मद मलिक वरीस अशी अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींची नावे आहेत. त्यांनी बोईसर आणि पालघरमध्ये घरफोड्या केल्याचे समोर आले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात, पण ७० लाख महिलांचा हप्ता झाला बंद, कारण आलं समोर

लसीकरणानंतर चिमुकलीचा मृत्यू; आजोबा रात्रभर मृतदेह घेऊन बसले, आरोग्य यंत्रणेचा संतापजनक प्रकार

SCROLL FOR NEXT