Noida Police detain youths after viral video of woman harassment sparks outrage on social media. Saam Tv
क्राईम

महिलेसोबत भयंकर घडलं, फ्लाइंग Kiss दिला अन् कारने पाठलाग केला, तासभरातच रोड रोमिओला अद्दल, नेमकं काय घडलं? VIDEO

Flying Kiss Obscene Gesture Viral Video: कारमधून महिलेकडे अश्लील चाळे करत पाठलाग करणाऱ्या दोन तरुणांचा व्हिडिओ व्हायरल झाला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपींना अटक केली आहे.

Omkar Sonawane

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. यावर नेटकऱ्यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे.या घटनेची माहिती मिळताच पोलिसानी तात्काळ कारवाई केली. दिल्लीतील नोएडामध्ये दोन तरुणांनी एका महिलेचा पाठलाग करत तिच्याकडे बघून अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

नोएडामध्ये एका पुलावर कारमधून महिलेकडे बघून अश्लील कृत्य केल्याचे समोर आले आहे. ही घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये स्पष्ट दिसत आहे की ही दोन तरुण महिलेकडे बघून गैरकृत्य करत आहे आणि त्यांचा पाठलाग देखील करत होते. यावेळी त्या महिला प्रचंड घाबरल्या आणि असुरक्षित वाटू लागले.

हा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आणि तपास सुरू केला. व्हिडिओच्या आधारे या टवाळखोरांची ओळख पटली आणि त्यांच्या मुसक्या आवळल्या. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी युवक अमित कुमार (मूळ रहिवासी – आजमगढ; सध्याचा पत्ता – जेव्हीएस सोसायटी, सेक्टर १३५, पोलीस ठाणे एक्सप्रेसवे, नोएडा) आणि अभिषेक (मूळ रहिवासी – कस्बा कुशमाहा, पोलीस ठाणे किसली, जिल्हा मैनपुरी; सध्याचा पत्ता – जेव्हीएस सोसायटी, सेक्टर १३५, नोएडा) असे आहेत.

पोलिसांनी त्यांची कार देखील जप्त केली आहे. UP 75 AH 3565 या गाडीचा नंबर आहे. दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPF update: इन हँड सॅलरी वाढणार, पीएफ नियम बदलले; कोणाला कसा फायदा होणार? जाणून घ्या

Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव कारने २ वर्षीय श्रृतिकाला चिरडलं, डॉक्टरविरोधात गुन्हा; थरारक VIDEO समोर

Maharashtra News Live Update: रायगडच्या दरी-डोंगरांत धबधबे प्रवाहीत; पर्यटनाला सुरुवात

Live Location Sharing : WhatsApp, Instagram वर तुम्हीही शोधू शकता मित्रांचे लाइव्ह लोकेशन; जाणून घ्या या सोप्या ट्रिक्स

Hindu Temple Tradition: मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी पायऱ्यांचा आशीर्वाद का घेतला जातो?

SCROLL FOR NEXT