Noida crime Saam Digital
क्राईम

Noida crime : पार्टीला बोलावून कॉलेजच्या विद्यार्थ्याची मित्रांनी केली हत्या, मृतदेह शेतात पुरल्यानंतर वडिलांना केला मेसेज

Noida BBA Student News: बीबीएच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याची त्याच्याच मित्रांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

BBA Student killed by Friends

बीबीएच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याची त्याच्याच मित्रांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. २६ फेब्रुवारी रोजी ही भयंकर घटना घडली.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मित्रांनी पीडित तरुणाला पार्टीसाठी बोलावलं. तिथं तरूण आणि त्या मित्रांमध्ये भांडण झालं. कधीपर्यंत तुम्ही माझ्या पैशांवर मजा माराल. आयुष्यात काहीतरी करा, असं या तरुणानं मित्रांना सुनावलं होतं. यावरून त्यांच्यात भांडण झालं. त्यानंतर पाच मित्रांनी त्याची हत्या केली. यश मित्तल असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. हत्येनंतर आरोपींनी तरुणाच्या अपहरणाचा बनाव रचला. त्यांनी पीडित तरुणाच्या वडिलांना मोबाइलवरून मेसेज पाठवून खंडणी मागितली.

मारेकरी जाळ्यात अडकले

ग्रेटर नोएडातील विद्यापीठ कॅम्पसमधून यशला घेऊन जाणाऱ्या अमरोहातील तरुणाचा पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने शोध घेतला. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी बुधवारी संध्याकाळी पाचपैकी तीन तरुणांना पोलिसांनी अटक केली.

६ कोटी रुपयांची खंडणी मागितली

पीडितच्या वडिलांना आरोपींनी त्याच्या मोबाइलवरुन एक खंडणीचा मेसेज पाठविला होता,त्यात आरोपींनी खंडणीची रक्कम ६ कोटी होती. ग्रेटर नोएडातील डीसीपी यांनी सांगितले की, मयत पीडितचे वडील प्रदिप मित्तल यांनी २७ फ्रेब्रुवारी रोजी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल केल्यानंतर यश राहत असलेल्या वसतिगृहातील कर्मचाऱ्यांशी चौकशी करण्यात आली होती. चौकशी दरम्यान वसतिगृहातील वॉडनर्न यश आदल्या रात्री पासून परत वसतिगृहात परतलाच नसल्याचे सांगितले.

यशच्या वडिलांना २७फेब्रुवारी रोजी सकाळी त्यांच्या मोबाइलवर आरोपींनी यशच्या मोबाइल नंबरवरुन यशचे अपहरण झालेला मेसेज करण्यात आला असून यशच्या सुटकेसाठी आरोपींनी तब्बल ६ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती.

पोलिसांनी नजर

यशच्या वडिलांनी खंडणीचा मेसेज येताच पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने नजर ठेवण्यास सुरु ठेवली तसेच दादरी पोलीस ठाण्यात अपहरण करुन खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली आपीसी कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला गेला. तपास लवकरात लवकर होण्यासाठी पोलिसांनी विद्यापीठ कॅम्पसममध्ये असलेले अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासले. यानंतर सीसीटीव्ही फुटेजमध्ये यश मंगळवार संध्याकाळी कॉलवर बोलत एका कारमध्ये बसून निघून गेला होता.

या हत्येमधील असलेला एक आरोपी रचित याच्यावर २८ फेब्रुवारी रोजी पोलिसांना संशय आला असता त्याची सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान रचिने यशच्या हत्येची कबुली दिली तसेच झालेला सर्व प्रकार सांगितला आणि इतर आरोपी शिवम, सुमित, सुशांत तसेच शुभम अशा सर्वांची नावे दिली. हे सर्व गजरौलाचे रहिवासी आहेत आणि यशला तेव्हापासून ते ओळखत होते असे डीसीपी यांनी सांगितले.

नेमके काय झाले...

जेव्हा यश मित्रांसोबत एका शेतात पार्टीला गेला तेव्हा त्यांच्यात झालेल्या भांडणामुळे सर्वांनी यशची गळा दाबून हत्या केली. हत्येनंतर सर्वांनी यशच्या मृतदेहाला शेतातील खड्यात पुरला.

यशचा मृतदेह शेतातील सहा फूट खोल खड्यातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला. पोलिसांनी सांगितले की आरोपी शिवम ,सुमित आणि सुशांत यांनी २८ फेब्रुवारी रोजी ग्रेटर नोएडातमधून अटक करण्यात आली असून अजून एक आरोपी शुभम फरार आहे तसेच पोलिसांनी सांगितले की त्यांचा विश्वास आहे की सुमितनेच यशचा गळा दाबला होता, ज्यामुळे तो या प्रकरणातील मुख्य संशयित होता.अतिरीक्त डीसापी अशोक कुमार यांनी सांगितले की आरोपींविरुद्ध दोन एफआयआर दाखल केले आहे.यशचे कुटुंब अमरोहा येथील गावातील आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope : तुम्हाला अचानक… राशीत काय? चांगलं की वाईट?

India vs South Africa: वर्ल्ड चॅम्पियन्सचा नाद करायचा नाय! भारताचा द.आफ्रिकेवर मोठा विजय; ३-१ ने मालिका जिंकली

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

SCROLL FOR NEXT