Bhiwandi Crime Saam tv
क्राईम

Bhiwandi Crime : पगार चोरला, सहकाऱ्याचा जीव घेतला; हत्येनंतर काश्मीरला पळाला, 'असा' झाला पर्दाफाश

Bhiwandi Crime News : कंपनीतील सहकाऱ्याने घात केल्याची घटना घडली आहे. कंपनीतील सहकाऱ्याने कर्मचाऱ्याची हत्या केल्याची घटना घडली आहे. हत्या केल्यानंतर आरोपी काश्मीरला अटक केली.

Vishal Gangurde

फैय्याज शेख, साम टीव्ही

कंपनीत काम करणाऱ्या कामगाराकडील पगार चोरला. त्यानंतर हत्या करून फरार झालेल्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यास यश आलं आहे. निजामपूर पोलिसांनी शिताफीने तांत्रिक तपासाच्या आधाराने जम्मू आणि काश्मीर येथून अटक करण्यात यश मिळवले आहे.

२१ वर्षीय साबीर रहमतुल्लाह अन्सारी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर निरजकुमार गोपीनाथ विश्वकर्मा असे हत्या झालेल्या कामगाराचे नाव आहे. ४ फेब्रुवारी शहरालगतच्या खोणी खाडीपार ग्रामपंचायत क्षेत्रातील शान हॉटेल शेजारील श्रीशुभ स्टोअर्स कारखाना या ठिकाणी मृत निरजकुमार आणि हत्या करणारा आरोपी हे दोघेही काम करीत होते. तेथे आरोपी साबीर अन्सारी याने चोरीच्या उद्देशाने लोखंडी हातोड्याने निरजकुमार यास मारहाण करून जबर जखमी केले होते. उपचारादरम्यान जखमीचा मुंबई येथील रुग्णालयात मृत्यू झाला.

याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास करणाऱ्या निजामपूर पोलिसांनी दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी हा दिल्ली येथे असल्याचे तांत्रिक तपासातून निष्पन्न झाल्याने निजामपूर पोलिस ठाण्याचे पोलिस पथक दिल्ली येथे आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना झाले. परंतु आरोपी तोपर्यंत तेथून निसटून गेला होता.

नवी दिल्ली रेल्वे पोलीस स्टेशन यांच्या मदतीने रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही आरोपी हा नवी दिल्लीकडून जम्मू तावी येथे रेल्वेने गेल्याचे दिसून आले. त्यानंतर आरोपीच्या मोबाईलचा तांत्रिक तपास करून स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपी यास लालचौक, अनंतनाग येथील एका बेकारीमधून ताब्यात घेतले. त्याच्या जवळून चोरीचा मोबाईल आणि रक्कम असा एकूण २९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकही केस गळणार नाय! रात्री झोपण्यापूर्वी करा 'हा' 1 सोपा उपाय; केस होतील लांब आणि मजबूत

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचा तळतळाट महायुतीला पडेल महागात; वडेट्टीवारांचा सरकारवर आरोप

Maharashtra News Live Update: महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होईल - मंत्री संजय शिरसाट

Mumbai Crime: भयानक ! पत्नीला ४ तास 'कोंबडा' बनवून अमानुष मारहाण; तडीपार आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Marathi Serial: 'मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; खासदार अमोल कोल्हेंनी सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT