Washim News Saam Tv
क्राईम

Shocking : कांदेपोह्याचा कार्यक्रम केला, रितीरिवाजाप्रमाणे लग्नगाठ बांधली, पहिल्याच रात्री वधूने केला कारनामा, लाखोंचे दागिने घेऊन फरार

Washim News : वाशीमच्या रिसोडमध्ये लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधू दागिने व रोकड घेऊन फरार. पोलिसांनी आंतरराज्यीय विवाह फसवणूक टोळीचा पर्दाफाश करून आरोपींच्या ताब्यातून सोनं व रोख रक्कम जप्त केली.

Alisha Khedekar

  • वाशीमच्या रिसोडमध्ये लग्नाच्या पहिल्या रात्री नववधू दागिने घेऊन फरार

  • पोलिसांनी आंतरराज्यीय विवाह फसवणूक टोळीचा पर्दाफाश केला

  • आरोपींकडून ४४ हजार रुपयांचे दागिने आणि १.२५ लाख रुपये रोख जप्त

  • महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील अनेक कुटुंबांना फसवल्याचे उघड

वाशीममध्ये एका नववधूने लग्नाच्या पहिल्याच रात्री दागिने घेऊन फरार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शोध घेत असताना पोलिसांनी एका आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. त्यांच्या ताब्यातून ४४ हजार रुपयांचे दागिने आणि १ लाख २५ हजार रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वाशीमच्या रिसोडमध्ये लग्न होताच पहिल्याच रात्री नववधू दागिन्यांसह पळून गेल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी एका आंतरराज्यीय टोळीचा वाशिमच्या रिसोड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. रिसोड पोलिसांनी या टोळीतील तीन महिला व एक पुरुषाला अटक केली. असून, त्यांच्या ताब्यातून ४४ हजार रुपयांचे दागिने आणि १ लाख २५ हजार रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत.

ही टोळी अत्यंत शिताफीने आधी मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम करायची. त्यानंतर पारंपरिक रीतीरिवाजांनुसार लग्न लावून देत असे. मात्र लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरी घरातील सोनं व रोख रक्कम घेऊन फरार व्हायची. त्यामुळे पीडित कुटुंब आर्थिक व सामाजिकदृष्ट्या उद्ध्वस्त होत होती. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील अनेक कुटुंबांना या टोळीने अशाच पद्धतीने फसवल्याचे समोर आले आहे.

रिसोड पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचत कारवाई केली. त्यात आरोपींना पकडण्यात यश आले. तपासादरम्यान आरोपींच्या ताब्यातून दागिने व रोकड जप्त करण्यात आली. या प्रकरणी रिसोड पोलिससात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या चोरट्यांना काय शिक्षा होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane : कबुतराला वाचवताना अग्निशामक जवानाचा मृत्यू, हाय व्होल्टेज विजेचा धक्का बसून जीव गेला

Ajit Pawar : कुठलंही काम शंभर टक्केच करतो, अन्यथा...; अजित पवारांचं शरद पवारांसमोर जोरदार भाषण

Maharashtra Live News Update: स्मार्ट सिटीचा स्मार्टपणा उघड, कल्याण डोंबिवलीत बाईकचा लाईट लावून स्मशानभूमीत अंत्यविधी

Honey Trap: मोठी बातमी! बहीण-भावाचा हनी ट्रॅपचा प्लॅन; आमदाराशी मैत्री करत मोबाईलवर पाठवले अश्लील चॅट अन् व्हिडिओ

Relationship Tips: या छोट्या चुकांमुळे तुमच्या नात्यात येईल दुरावा, वेळीच घ्या काळजी

SCROLL FOR NEXT