New Mumbai Crime News saam Digital
क्राईम

New Mumbai Crime News: फॅशनेबल बांगड्या घातल्यानं विवाहितेला मारहाण; नवी मुंबईतील संतापजनक घटना

Crime News: विवाहितेने फॅशनेबल बांगड्या घातल्याने सासरच्या व्यक्तींकडून तिला मारहाण करण्यात आलीये. आरोपींविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ruchika Jadhav

New Mumbai:

महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना आजून थांबताथांबत नाहीयेत. आजही महिला कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी ठरत आहेत. नवी मुंबईतील दिघा येथून अशीच एक संतापजनक घटना समोर आलीये. विवाहितेने फॅशनेबल बांगड्या घातल्याने सासरच्या व्यक्तींकडून तिला मारहाण करण्यात आलीये. आरोपींविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, रबाळे एमआयडीसी पोलिसांत पीडितेने धाव घेत घडलेली घटना सांगितली. त्यानंतर महिलेचा पती, सासू आणि अन्य एका महिला नातेवाईकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सदर घटनेत २३ वर्षीय पीडिता पती आणि सासूसह दिघा येथे राहते. १३ नोव्हेंबर रोजी महिलेने सुंदर साडी नेसली होती. तसेच साजश्रृंगार करत नवीन फॅशनेबल बांगड्याही घातल्या होत्या. तिच्या पतीने हे पाहिले असता त्याला पत्नीचा राग आला. पत्नीने फॅशनेबल बांगड्या घालूनयेत असं त्याचं म्हणणं होतं.

मात्र पत्नीने पतीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि आपल्या हातातील बांगड्या तशाच ठेवल्या. थोड्यावेळाने पती आणि पत्नी दोघांमध्ये पुन्हा याच कारणावरून वाद सुरू झाला. हा वाद पुढे इतका वाढला की, पतीने रागाच्या भरात पत्नीला मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेळी सासू देखील घरातच होती.

पती पत्नीमधील सुरू असलेली भांडणे पाहून वाद मिटवण्याऐवजी सासूनेही आपल्या सुनेचे केस ओढत तिला मारहाण केली. तसेच त्यांच्या नात्यातील अन्य एका महिलेनेही पीडितेला मारहाण करण्यास मदत केली. सासरच्यांनी सुनेला पट्ट्यानेही मारहाण केली. या घटनेनंतर पीडिता आपल्या माहेरी निघून आली.

घडलेला प्रकार तिने आपल्या आई वडिलांना सांगितला. मुलीला सासरी मिळालेली वागणूक ऐकून तिच्या कुटुंबियांचाही संताप झाला. आपल्या मुलीला न्याय मिळाच पाहिजे या भावनेने त्यांनी पोलीस स्टेशन गाठले. रबाळे एमआयडीसी पोलिसांकडून या प्रकरणी सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad Live : जालना जिल्ह्यातील नगरपालिका मतदान टक्केवारी

Kalyan News: शहरात एकाच नंबरच्या दोन रिक्षा; दंड ठोठावल्यानंतर झाला कल्याणमधील बनावट नंबरप्लेटचा पर्दाफाश

Local Body Election: पैसे वाटप करणाऱ्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला पकडलं; संतप्त नागरिकांनी मतदान केंद्राबाहेरच चोपलं

Santosh Bangar : संतोष बांगर वादाच्या भोवऱ्यात; निवडणूक अधिकाऱ्यांकडून गुन्हा दाखल, आमदारांनी काय केलं?

भारतात लवकरच लाँच होणार धमाकेदार Realme आणि Redmi चे फोन , फीचर्स आहेत शानदार

SCROLL FOR NEXT