Baramati Shocker: Corporator Booked For Alleged Molestation And Harassment Of Widow 
क्राईम

अजित पवार गटाच्या नेत्याकडून महिलेचा विनयभंग; विधवेकडे नगरसेवकानं केली शरीरसुखाची मागणी

NCP Corporator Molestation Widow Woman: राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) एका नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधवा महिलेकडे शरीरसुखाची मागणी राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने केल्याची घटना बारामती घडली आहे.

Bharat Jadhav

  • बारामतीत नगरसेवकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल.

  • विधवा महिलेने शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप केला.

  • फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचाही तक्रारीत उल्लेख.

बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगरसेवकाच्या विरोधात विनयभंगाच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरसेवकाने एका विधवा महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याची घटना बारामतीत घडली आहे. फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेकडे शरिरसुखाची मागणी केली असं तक्रारीत म्हटलंय. किशोर आप्पासाहेब मासाळ असं गुन्हा दाखल झालेल्या नगरसेवकाचे नाव आहे.

विधवा महिलेचा छळ करून पीडित महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसून तिचा विनयभंग करणे, मारहाण करणे,तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देणे, याशिवाय संबंधित महिलेला उद्योजकांकडून खंडणी वसूल करायला लावण्यासाठी तिच्यावरती दबाव टाकेन, असे विविध आरोप किशोर मासाळ यांच्यावरती करण्यात आलेत.बारामती तालुका पोलीस ठाण्यात संबंधित पीडितेच्या तक्रारीवरून किशोर मासाळ याच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ फेब्रुवारी २०२६ ते २५ मे २०२६ या कालावधीत हा प्रकार घडलाय. पीडित महिलेच्या पतीचे निधन झाले असल्याने ती विधवा आणि असहाय्य असल्याचा गैरफायदा आरोपीने घेतला. ओळख असल्याचा फायदा घेऊन आरोपीने वेळोवेळी महिलेच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश केला. तिथे त्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी करत तिचा विनयभंग केला.

आरोपीने पीडित महिलेला धमकावत, “तू बारामती येथील उद्योजकांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून मला पैसे काढून दे, नाहीतर तुझे फोटो सोशल मीडियावर टाकून तुझी बदनामी करीन,” अशी धक्कादायक धमकी दिली. या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून पीडितेने बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून बारामती तालुका पोलीस ठाण्यात किशोर आप्पासाहेब मासाळ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सासूसाठी सुनबाई बिबट्याशी भिडली, संकटात नातूनेही दाखवलं धाडस

IAS Officers Suspended: ठेकेदारांच्या पैशातून यूरोप-ऑस्ट्रेलियाचा दौरा; दोन IAS अधिकारी सस्पेंड, प्रशासकीय विभागात खळबळ

हातभट्ट्यांवर वरदहस्त कुणाचा? 22 जणांच्या बळीनंतर पोलीस प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर, 22 अधिकाऱ्याचं निलंबन

माजी मुख्यमंत्र्यांना सरकारी बंगला रिकामा करावा लागणार; भाजप सरकारने दिला 15 दिवसांचा अल्टीमेटम

Pratap Sarnaik: अखेर पालीकरांचे स्वप्न पूर्ण! अत्याधुनिक बसस्थानक उभारणार; मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT