Navi Mumbai Crime News  Saam Tv
क्राईम

Navi Mumbai Crime: विवाहबाह्य संबंध, लग्नाला नकार दिल्याने तरुणाची सटकली, गर्लफ्रेंडच्या नवऱ्याला संपवलं

Vashi News: नवी मुंबईमध्ये तरुणाने गर्लफ्रेंडच्या नवऱ्याची हत्या केली. लग्नाला नकार दिल्यामुळे त्याने रागाच्या भरात हे कृत्य केले. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Priya More

विकास मिरगणे, नवी मुंबई

नवी मुंबईमध्ये तरुणाने गर्लफ्रेंडच्या नवऱ्याला संपवल्याची घटना समोर आली आहे. महिलेने लग्नाला नकार दिला त्यामुळे आरोपीने तिच्या नवऱ्याची हत्या केली आणि मृतदेह लपवून ठेवला. या प्रकरणी महिलेने पोलिस ठाण्यामध्ये धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास करत असताना महिलेच्या बॉयफ्रेंडनेच हे कृत्य केल्याचे समोर आले. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील वाशीमध्ये ही घटना घडली. एका २५ वर्षीय विवाहित महिलेनं लग्नाला नकार दिल्याच्या रागातून तिच्या बॉयफ्रेंडने टोकाचे पाऊल उचलले. त्याने या महिलेच्या नवऱ्याची हत्या केली. या प्रकरणी पीडित महिलेनेच पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. आबुबकर सुहादअली मंडल (वय ३५ वर्षे) असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर अमीनुर अली अहेमदअली मौल्ला (वय २१ वर्षे) असं आरोपीचे नाव आहे.

फातीमा आबुबकर मंडल (२५ वर्षे) ही महिला वाशी गावातील केरळा हाऊस समोरील झोपडपट्टीमध्ये राहते. ती घरकाम करून आपला संसार चालवते. तिची ओळख अमीनुर अली अहेमदअली मौल्ला याच्यासोबत झाली. या दोघांची खूप चांगली मैत्री झाली त्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. आरोपी फातीमावर लग्न करण्यासाठी दबाव टाकू लागला. पण तिने लग्नाला स्पष्ट नकार दिला. त्यामुळे त्याने फातीमाच्या नवऱ्याचीच हत्या केली

फातीमाचा नवरा नेहमीप्रमाणे कामावर गेला पण संध्याकाळी तो घरी परत न आल्यामुळे चिंतेत आलेल्या फातीमाने त्याचा इकडे तिकडे शोध घेतला. तो कुठेच भेटला नाही त्यामुळे तिने थेट पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता एक गंभीर बाब समोर आली. आरोपी अमीनुर अली अहेमदअली मौल्लाने फातीमाला लग्नासाठी वारंवार तगादा लावला होता. मात्र फातीमाने स्पष्ट नकार दिला. नकार सहन न झाल्याने त्याने संतापाच्या भरात तिच्या नवऱ्याची हत्या केली.

हत्या केल्यानंतर आरोपीने मृतदेह कोणत्यातरी अज्ञात ठिकाणी लपवून ठेवला. इतकंच नव्हे तर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने कपडे आणि इतर वस्तू पनवेल-सायन रोडवरील वाशीगाव अंडरपास रोडजवळील खाडीमध्ये फेकून दिल्या. या प्ररकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याच्याविरोधात कलम कलम १०३(१), २३८, ३०२ आणि २०१ अंतर्गत गुन्हा दाखल केला. सध्या आरोपी फरार आहे. आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांनी टीम तयार केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chalisgaon News : चाळीसगावजवळ ५० कोटींचे ड्रग्स जप्त; महामार्ग पोलिसांची मध्यरात्री कारवाई

Maharashtra Live News Update: पुण्यात गाड्यांची तोडफोड सुरूच, फुरसुंगी पोलिस स्टेशनच्या हद्दीत टोळक्यांचा धुमाकूळ

Shravan Special: श्रावणात करा ५ वस्तू दान, जीवनात येईल भरभराट

Mumbai Rain : मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, रस्ते, रेल्वे वाहतुक सुरळीत | VIDEO

Government Job: सरकारी कंपनीत नोकरीची संधी अन् ४८ लाखांचे पॅकेज; अर्ज कुठे अन् कसा करावा?

SCROLL FOR NEXT