Nashik Latest Crime News 
क्राईम

Nashik : शिक्षकी पेशाला काळीमा, मुख्याध्यापकाने सहावीच्या मुलीवर केला बलात्कार

Nashik Crime News : नाशिकमध्ये शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघड झाली आहे. शिक्षकाकरवी घरी बोलवून सहावीत शिकणाऱ्या मुलीवर मुख्याध्यापाकाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघड झाली.

Namdeo Kumbhar

Nashik Latest Crime News : आपल्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी शिक्षक प्रयत्नांची पराकाष्टा करतात. मात्र, याच पवित्र नात्याला नाशिकमध्ये काळिमा फासलाय गेलाय. नाशिकमध्ये शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना घडली आहे. घोटीमध्ये मुख्याध्यापाकानेच सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. या घटनेची माहिती कळताच पीडित मुलीच्या कुटुंबियांच्या पायाखालची वाळूच सरकली.

नाशिकमधील घोटी येथे सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर शाळेच्या मुख्याध्यापकाकडून अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली. मुख्याध्यापकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून अधिक तपास करण्यात येत आहे. संतप्त पालकांनी मुख्याध्यापका विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला एका शिक्षकाकरवी घरी बोलवून मुख्याध्यापकाने अत्याचार केला. मुलीने आपल्यासोबत घडलेला प्रसंग पालकांना सांगिता, त्यांची पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. घटना उघडकीस आल्यानंतर मुख्याध्यापकाला घोटी पोलिसांकडून अटक कऱण्यात आली. मुख्याध्यापकासह एका शिक्षकावर घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. वरिष्ठ पोलीस अधिकारी घोटीत दाखल, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

सहावीत शिकणाऱ्या अल्पवीय मुलीवर शिक्षाकाने बलात्कार केल्याची घटना वाऱ्यासारखी घोटी शहरात पसरली. घोटीमध्ये संतप्त नागरिकांनी रोष व्यक्त केला. काहींनी शिक्षकाला फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी केली. पोलिसांसमोर ठिय्या देण्यात आला. नराधम मुख्याध्यापकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत, त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. पोलीस या प्रकराचा कसून तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT