Nashik Crime Saam Tv
क्राईम

Nashik Crime : भाजप पदाधिकाऱ्याकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पिस्तुलाचा धाक दाखवत केला अत्याचार

Crime News : नाशिकमध्ये भाजप पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. आर्थिक व्यवहारातून त्याने फिर्यादीच्या मागे तगादा लावला होता. पैसे परत न मिळाल्याने त्याने पिस्तुलाचा धाक दाखवत फिर्यादीच्या मुलीवर विनयभंग केला.

Yash Shirke

अभिजीत देशमुख, साम टीव्ही, प्रतिनिधी

नाशिकमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकमधील भाजप पदाधिकाऱ्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. भद्रकाली पोलीस ठाण्यात मध्यरात्री रोहित कुंडलवाल या भाजपच्या पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली. त्याच्यावर अवैध सावकारी, ठार मारण्याची धमकी देणे आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादीला रोहित कुंडलवालने पैशाच्या व्यवहारातून त्रास देत होता. पैसे देत नसल्याने त्याने फिर्यादीच्या १५ वर्षीय मुलीला पिस्तुलाचा धाक दाखवला आणि तिच्यावर विनयभंग केला. पैशासाठी धमकी देणे आणि लोकांकडून बळजबरीने पैसे उकळणे हा रोहित कुंडलवाल आणि त्याच्या वडिलांचा उद्योग आहे.

नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यातील पोलिसांनी आरोपी रोहित कुंडलवालला मध्यरात्री बेड्या ठोकल्या. पण त्याचे वडील कैलास कुंडलवाल अद्यापही फरार आहेत. दरम्यान पोलिसांनी रोहित कुंडलवालकडून ३ मोबाईल, आलिशान कार, पिस्तुल आणि काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत.

फिर्यादीच्या तक्रारीनंतर हा प्रकार समोर आला. या घटनेमुळे नाशिकमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. रोहित कुंडलवालच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. त्याच्या फरार वडिलांनाही अटक व्हावी असे लोक म्हणत आहेत. दरम्यान भाजप पदाधिकाऱ्याच्या या कृत्यामुळे स्थानिक पातळीवर पक्षाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिक जिल्ह्यासाठी हवामान खात्याकडून तातडीचा 'रेड अलर्ट' जारी

Shocking : धक्कादायक! सासऱ्याच्या धक्क्याने खाली पडून सुनेचा मृत्यू; ८ महिन्यांची चिमुकली आईविना पोरकी

Fatty Liver: लिव्हरवर फॅट्स जमा होऊन सूज आलीये? रोज प्या ही ३ ड्रिंक्स, काही दिवसातच वितळून जाईल चरबी

Local Body Election : राज्यात पुन्हा निवडणुकीचं बिगुल वाजणार, २० जिल्हा परिषदा, पंचयत समित्या, ग्रामपंचायतमध्ये धुरळा

Rain Alert : राज्यात मुसळधार पाऊस धुमाकूळ घालणार! ३१ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता; IMD चा मोठा अलर्ट

SCROLL FOR NEXT