Nahik Accident NEWS Saam t
क्राईम

Nashik Accident News: आनंदाचा प्रवास ठरला मृत्यूचा सापळा; नाशिकमधील 9 जणांचा मारेकरी कोण?

Nashik Accident News: नाशिकच्या दिंडोरीत एका विहिरीनं 9 जणांचा जीव घेतलाय.. होय तुम्ही बरोबर ऐकताय...एकाच कुटुंबातल्या या ९ प्रवाशांच्या जीवावर विहीर कशी उठली...कोण आहे या नऊ जणांचा मारेकरी पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून

Suprim Maskar

काळजाचा थरकाप उडवणारा हा अपघात घडलाय... नाशिकच्या दिंडोरीत... एका खाजगी क्लासचं वार्षिक स्नेहसंमेलन आटोपून दरगुडे कुटुंब आपल्या मुलांसह आनंदाने घरी परतत होतं...रात्रीची वेळ होती, रस्ता ओळखीचा होता, पण एका वळणावर काळ दबा धरून बसला होता... रात्री 10.15 मिनटांनी दरगुडे कुटुंबावर काळानं मोठा घाला घातला. दरगुडे कुटुंबाची कार थेट विहिरीत कोसळली.... या भीषण अपघातावेळी नेमकं काय घडलं पाहूयात...

कसा झाला अपघात?

अपघातानंतर सुरुवातीचे 5 मिनिटं गाडीचे टेल लॅम्प दिसले मात्र नंतर कार दिसेनाशी झाली

- प्रवाशांनी गाडीच्या काचा फोडण्याचा प्रयत्न केला

- अपघातानंतर 20 मिनिटांनी अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले..

- विहिरीत दोरखंड टाकून आणि मोटारीनं पाणी उपसून रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आलं...

- तब्बल 3 तासांनंतर दुर्घटनाग्रस्त कार विहिरीबाहेर काढण्यात यश मिळालं...

- मात्र गाडीत 8 तर विहिरीत एका मुलीचा मृतदेह आढळला... आणि दरगुडे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला..

दरगुडे कुटुंबातीलच 9 जणांचा या अपघातात दुर्देवी मृत्य़ू झाल्यानं गावातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली...विहिरीला साधा कठडाही का नव्हता? हा प्रश्न विचारताच विहीर मालकानं यासंदर्भात नगरपंचायतीकडे जाळी लावण्याची मागणी केल्याचा दावा केलाय.

मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी तपासाचे आदेश देत विहिर मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय...

दरम्यान इंदोरे गावातील या घटनेनंतर प्रशासनाला जागी आलीय...रस्त्याच्या कडेला 3 फुटांवर असणाऱ्या या विहिरीला बुजवण्याचं काम करण्यात आलं... तर खाजगी क्लास संचालकांला स्नेहसंमेलन घेण्याची परवानगी होती का? याबाबतही चौकशीचे आदेश दिलेत.... मात्र 1972 पासून असणाऱ्या या विहिरीकडे प्रशासनाचं लक्ष का गेलं नाही... रस्त्याशेजारी असणारी ही विहिर अपघातानंतरच प्रशासनाला आता का धोकादायक वाटतेय... आणि अपघातातील त्या 9 जणांचा खरा मारेकरी कोण? हा खरा प्रश्न आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT