Nashik Crime:  Sakal
क्राईम

Nashik Crime: लासलगावच्या डॉक्टरची लुटमार; पोलिसांनी आवळल्या ‘मोस्ट वॉन्टेड’ गुन्हेगारांच्या मुसक्या

Bharat Jadhav

Nashik Crime :

नांदूरमध्यमेश्वर येथील डॉक्टराला अडवून त्यांची लुटमार करणाऱ्या तिघा आरोपींना पोलिसांनी अटक केलीय. आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवून डॉक्टरची लूटमार केली होती. याप्रकरणी नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने तिघा कुख्यात गुन्हेगारांना अटक केलीय. (Latest News)

श्रावण उर्फ श्रावण्या सुरेश पिंपळे (२६, रा. नैताळे, ता. निफाड), नितीश मधुकर हिवाळे (३२, रा. राजूर रोड, पीर पिंपळगाव, जि. जालना), सचिन शिवाजी दाभाडे (२५, रा. गोरक्षनाथनगर, हरसुल, जि. छ. संभाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ ऑक्टोबरच्या रात्री डॉ. विनोद चंद्रभान ढोबळे हे क्लिनीक बंद करून लासलगावाला परतत होते. त्यावेळी आरोपींनी त्यांची लूट करत तब्बल २ लाख रुपयांचा ऐवज त्यांनी पळवला. डॉक्टर ढोबळे हे लासलगावाला जात असताना विंचूर एमआयडीसी पार्क परिसरात आरोपींनी त्यांना अडविले. त्यांच्या डोक्याला बंदूक लावून त्यांना येवल्याकडे निर्जनस्थळी नेले.

आरोपींनी त्यांच्याकडील एटीएम, मोबाईल काढून घेत घेतला. त्यांनी आरोडाओरड करून नये म्हणून आरोपींनी त्यांचा शर्ट काढला. त्या शर्टाने त्यांना बांधले. डॉक्टरच्या तोंडात बोळा कोंबला.त्यानंतर त्यांना निर्जनस्थळी फेकून देऊन ते कार घेऊन पळून गेले. त्यानंतर आरोपींनी एटीएममधून पैसे काढले. आरोपींनी एकूण २ लाख ६५ हजारांची ऐवज लुटला असल्याची गुन्हा त्यांनी लासलगाव पोलिसात दाखल केला.

पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास देण्यात आला. पोलिसांनी बीड जिल्ह्यातील आष्टी व नगर जिल्ह्यातील जामखेड परिसरात सापळा रचून तिघां आरोपींना अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, तिघे संशयित हे अट्टल गुन्हेगार आहेत. या तिघांविरोधात नाशिकसह नगर, संभाजीनगर जिल्ह्यांमध्ये दरोडे, घरफोड्यांचे गुन्हे दाखल आहेत. अटक केल्यानंतर या तिघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालायने या तिघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक निरीक्षक सागर कोते, गणेश शिंदे, उपनिरीक्षक नाना शिरोळे, हवालदार नवनाथ सानप, विश्वनाथ काकड, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, नारायण पवार यांच्या पथकाने या तिन्ही आरोपींनी अटक केली. पथकाची यशस्वी कामगिरीचं कौतुक करत अधीक्षक उमाप यांनी पथकाला १५ हजारांचे रिवॉर्ड घोषित केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीचं जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

SCROLL FOR NEXT