Nashik Crime Saam Tv
क्राईम

Nashik Crime : नाशिक हादरलं! विहिरीत आढळले २ मुलींचे मृतदेह, आत्महत्या की घातपात? तपास सुरू

Two girls Dead bodies found in well in Kalwan : नाशिक जिल्ह्यातमध्ये दोन मुलींचे मृतदेह आढळले आहेत. कळवण जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.

Rohini Gudaghe

अभिजित सोनवणे, साम टीव्ही नाशिक

नाशिकमध्ये एका विहिरीमध्ये दोन मुलींचे मृतदेह आढळल्याची घटना समोर आलीय. कळवण तालुक्यात ही धक्कादायक घटना घडलेली आहे. मृत मुलींपैकी एक अल्पवयीन आहे, तर दुसरी तरूणी २० वर्षांची असल्याची माहिती मिळतेय. ही घटना २६ ऑगस्ट रोजी उघडकीस आली होती, या दोन्ही मुली मैत्रिणी होत्या, अशी प्राथमिक माहिती समोर आलीय.

विहिरीत आढळले २ मुलींचे मृतदेह

नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात विहिरीत दोन मुलींचे मृतदेह (Nashik Crime News) आढळले. एकाच वेळी दोन मुलींचे मृतदेह आढळून आल्याने कळवणमध्ये मोठी खळबळ उडाली होती. माधुरी मोरे (२० वर्ष)आणि गीतांजली एखंडे (१३ वर्ष) अशी दोन्ही मृत मुलींची ओळख पटली आहे. या दोन्ही मुली मैत्रिणी होत्या. त्या २५ तारखेला सोबतच घराबाहेर पडल्या होत्या. परंतु त्यानंतर त्या घरी परतल्याच नाही, वाट बघून घरातील व्यक्ती कंटाळले होते. अखेर मुलींचा शोध घेण्यासाठी नातेवाईक बाहेर पडले.

अपघात की घातपात?

या दोघी २५ ऑगस्टपासून बेपत्ता होत्या. तेव्हापासून या दोन्ही मुलींच्या घरचे त्यांचा शोध घेत (Nashik News) होते. कळवणच्या लिंगामे गावातील गोपीनाथ पालवी यांच्या शेतातील विहिरीमध्ये या दोन्ही मुलींचे मृतदेह २६ ऑगस्ट रोजी आढळले होते. आता याप्रकरणी भावना पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलीय. आत्महत्या की घातपात, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू (Dead bodies of two girls found in well) आहे. नक्की या घटनेमागे कोणतं गुढ दडलंय, याचा पोलीस शोध घेत आहेत.

गडचिरोलीत तरूणीची घेऊन आत्महत्या

गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुका मुख्यालयापासून २ किलोमिटर अंतरावर असलेल्या मोहगाव नावाचं गाव आहे. येथे एका १८ वर्षीय तरूणीने गळफास घेऊन आत्महत्या केलीय. प्रेमी चंद्रभान मडावी, असं मृत तरूणीचं नाव (Crime News) आहे. ही तरूणी आजीसोबत मोहगाव येथे राहत होती. तिचे आई, वडील आणि दोन भाऊ परराज्यात मोलमजुरी करतात. दरम्यान तरूणीनं आत्महत्या का केली? याचं कारण अजूनही अस्पष्ट असून पुढील तपास कोरची पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Medical Education Scam : मेडिकल शिक्षण क्षेत्राला हादरवणारा घोटाळा, महाराष्ट्रासह 10 राज्यांमध्ये कॉलेजांवर धाड

Bank Fraud Alert : PWD घोटाळ्याचा पर्दाफाश! SBI अधिकाऱ्याच्या सतर्कतेने १११ कोटींची लूट टळली

Bhindi Bhaji Benefits: हिवाळ्यात भेंडी खा, हाडे दुखींना मिळेल आराम

IND vs SA: टेस्टमधील दारूण पराभवानंतर कोचपदावरून गंभीरची हकालपट्टी? अखेर बीसीसीआयने दिलं उत्तर

Maharashtra Live News Update: मंगळवेढा नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीला स्थगिती ,जिल्हाधिकारी यांची माहिती

SCROLL FOR NEXT