Police Busted Gang That Printed Fake Notes Saam Tv
क्राईम

Nashik Breaking: मोठी बातमी! बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; हॉटेलमध्ये छापायचे पाचशेच्या नोटा

Police Busted Gang That Printed Fake Notes: नाशिकमध्ये बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. आरोपींकडून पाचशे रूपयाच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.

Rohini Gudaghe

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही नाशिक

नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे. अंबड पोलिसांनी बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. नाशिकमध्ये बनावट नोटा छापणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे. नाशिकमध्ये बनावट नोटा छापण्याचा गोरखधंदा सुरू असल्याचं समोर आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आरोपींनी या नोटा चलनात आणल्याचं देखील समोर आलं आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, एक टोळी नाशिकमध्ये बनावट नोटा छापण्याचं काम करीत होती. खऱ्या नोटा स्कॅन करून प्रिंटरवरून त्याच्या प्रिंट काढून बनावट नोटा तयार करण्यात येत (Nashik Crime News) होत्या. पाचशेच्या बनावट तयार करून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करताना अंबड पोलिसांनी या टोळीला रंगेहाथ अटक केली आहे.

अशोक पगार, हेमंत कोल्हे, नंदकुमार मुरकुटे अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. सिन्नरच्या एका हॉटेलमध्ये प्रिंटरच्या मदतीने पाचशेच्या बनावट नोटा छापल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. या आरोपींकडून पाचशे रुपयांच्या ४७ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच पोलिसांनी बनावट मोठा छापण्यासाठी वापरण्यात आलेला प्रिंटर आणि लॅपटॉप (Gang That Printed Fake Notes) देखील हस्तगत केला आहे.

या आरोपींनी पाचशेच्या दोन बनावट नोटा (Fake Note) खऱ्या नोटांमध्ये लपवल्या होत्या. त्यांनी त्या एका खाजगी बँकेच्या डिपॉझिट मशीनमध्ये चलनात देखील आणल्याची कबुली दिल्याचं अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी सांगितलं आहे. आयकर विभागाने या आठवड्यात नाशिकमध्ये मोठी कारवाई केली होती. त्यांनी सराफा व्यावसायिकांच्या दुकानांवर छापे टाकले होते. या कारवाईत मोठं घबाडदेखील त्यांना सापडलं होतं. आता पुन्हा नाशिकमध्ये बनावट नोट छापणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक (Crime News) केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: चंद्रपुरात वायू प्रदूषणाचा कहर; साडेतीन वर्षांत 325 जणांचा मृत्यू

Jamun Benefits: तुम्हाला पण जांभूळ खायला फार आवडतात? मग वाचा त्याने शरिराला कोणते फायदे होतात?

Anulom Vilom Benefits: प्रदूषणामुळे श्वसनाचे त्रास होतात? मग सकाळी १० मिनिटांसाठी करा हे सोपे योगासन

Ratnagiri: बाप्पाचं दर्शन घेऊन बीचवर मज्जा करायला गेले अन् अनर्थ घडला; ५ जणांचा बुडून मृत्यू, नावं आली समोर

Acidity : ॲसिडीटी, पोटदुखीमुळे तुमचं मुल खूप रडतंय? करा ‘हा’ घरगुती उपाय, मिनिटांत वाटेल बरे

SCROLL FOR NEXT