Nashik Crime Latest News:  Saamtv
क्राईम

Nashik Crime: जेलमधून सुटताच 'रोड शो', आता भररस्त्यातून निघाली धिंड, नाशिकच्या 'बॉस'ची पोलिसांनी जिरवली; मिरवणूक अंगलट आली!

Nashik Crime Latest News: या रोड शोनंतर पोलिसांनी त्याला पुन्हा ताब्यात घेत जेलमध्ये रवानगी केली होती. त्यानंतर आज पोलिसांनी या गुंडांची त्याच रस्त्यावरुन धिंड काढली.

अभिजीत सोनावणे

नाशिक, ता. २७ जुलै २०२४

नाशिक शहरात एका गुंडाची जेलमधून सुटल्यानंतर जंगी मिरवणूक काढल्याचे समोर आले होते. गाड्यांचा ताफा, जोरदार घोषणाबाजी करत हा रोड शो निघाला होता ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी या भाईला पुन्हा बेड्या ठोकल्या. त्यानंतर आता त्याच रस्त्यावरुन पोलिसांनी धिंड काढल्याचे समोर आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिक शहरात जेलमधून सुटून आल्यानंतर हर्षद पाटणकर याची जंगी मिरवणूक निघाल्याचे समोर आले होते. सराईत गुन्हेगार हर्षद सुनील पाटणकरला जुलै २०२३ मध्ये एमपीडीए कायद्यानुसार नाशिक रोड कारागृहात वर्षभरासाठी स्थानबद्ध केले होते त्यानंतर हर्षदची मंगळवारी कारागृहातून सुटका झाली.

सुटकेनंतर त्याच्या साथिदारांनी पाटणकर याच्या जंगी मिरवणुकीचे आयोजन केले होते. शहरातील बेथेलनगर, आंबेडकर चौक, साधु वासवानी रोड, शरणपूर रोड या मार्गावर त्याचा हा रोड शो झाला. या रोड शोनंतर पोलिसांनी त्याला पुन्हा ताब्यात घेत जेलमध्ये रवानगी केली होती. त्यानंतर आज पोलिसांनी या गुंडांची त्याच रस्त्यावरुन धिंड काढली.

ज्या रस्त्यावरून भाईची जंगी रॅली निघाली त्याच रस्त्यावर नाशिक पोलिसांकडून हर्षद पाटणकरसह त्याच्या साथीदाराची धिंड काढण्यात आली. पोलिसांच्या या धडक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान, या मिरवणूक प्रकरणी हर्षद पाटणकर व गोपाल नागोलकर या दोघांसह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT