nashik crime news Saam Tv
क्राईम

Nashik Crime News: नाशिक हादरलं! प्रेम एकाशी चॅट मात्र दुसऱ्याशी; संशय आल्यानंतर बॉयफ्रेंडनं नर्ससोबत केलं भयंकर कृत्य

Vishal Gangurde

तबरेझ शेख, नाशिक

Nashik News:

नाशिकवरून धक्कादायक वृत्त हाती आली आहे. नाशिकमध्ये दुसऱ्या मित्रासोबत मोबाईलवर चॅटिंग करण्याच्या कारणावरून प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह निर्जनस्थळी फेकून दिला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. (Latest Marathi News)

हत्या करून मृतदेह निर्जनस्थळी फेकला

नाशिक खासगी नर्सिंग होममध्ये नर्स असलेल्या युवतीचा प्रियकराने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकराने हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याकरिता मृतदेह निर्जनस्थळी फेकून दिला. काल रासबिहारी आरटीओ लिंक रोडवर म्हस्के नगर येथे या युवतीचा मृतदेह आढळल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रियंका वसावे असे या हत्या झालेल्या २४ वर्षीय युवतीचे नाव आहे. पंचवटी पोलिसांनी दोन तासांत संशयित प्रियकराचा माग काढत त्याला अटक केली. आरोपीला मदत करणाऱ्या संशयितालाही ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी सागर तडवी आणि गुंमनर रासे या दोघांना अटक केली आहे .

नेमकं काय घडलं?

आडगाव नाका येथील एका नर्सिंग होममध्ये नर्स म्हणून नोकरी करत असलेल्या प्रियंकाचं तिच्या गावातील सागर चिवदास तडवी याच्यासोबत प्रेमसंबंध होते. एका खासगी कंपनीमध्ये नोकरी करणारा सागर तडवी हा दत्त नगर अंबड येथे राहतो. प्रियंका ही सायंकाळी ५ वाजता त्याला भेटण्यास दत्त नगर येथील त्याच्या खोलीवर गेली होती. दोघांनी सोबत जेवण केले. रात्री सागर झोपलेला असताना प्रियंका एका युवकासोबत चॅटिंग करत असल्याचे त्याच्या लक्षात आले.

दोघांमध्ये वाद झाले. सागरने चार्जिंग वायरने तिची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर मुतदेह दुचाकीवर आपल्या मित्राला सोबत घेऊन ट्रिपल सीट आणून पंचवटी परिसरात निर्जनस्थळी टाकून पोलिसांची दिशाभूल करण्यात आली. मात्र पोलिसांनी अवघ्या काही तासात या हत्येचा उलगडा केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sillod Politics : सिल्लोडमध्ये मंत्री अब्दुल सत्तार यांची एकाहाती सत्तार कोण भेदणार? महाविकास आघाडीकडून कोणाची तयारी? वाचा सविस्तर

Maharashtra News Live Updates: शरद पवार गटात सामील होताच हर्षवर्धन पाटील यांना मोठी जबाबदारी

VIDEO : अजित पवारांचा शिंगणे यांना फोन; नाराजी दूर करण्याचा अजितदादांचा प्रयत्न

Virat Kohli Record : रनमशीन कोहलीचा 'विराट' रेकॉर्ड; थेट तेंडुलकर-गावसकर क्लबमध्ये एन्ट्री

India vs New Zealand : विराट कोहली आणि सरफराजने डाव सावरला; भारताचं जोरदार कमबॅक, न्यूझीलंडकडे १२५ धावांची आघाडी

SCROLL FOR NEXT