Nashik Bhakti Gujarati Case  Saam Tv News
क्राईम

Bhakti Gujarathi Death : भक्ती गुजराती मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट, नाशिक पोलिसांनी गुजरातमध्ये जाऊन...

Nashik Bhakti Gujarati Case : नाशिक पोलिसांनी गुन्ह्यातील तिघही आरोपींना गुजरात येथून अटक केली आहे. भक्ती गुजराती तिचे पती अथर्व गुजराती, सासरे योगेश गुजराती, सासू मधुरा गुजराथी या अटक केलेल्या तिघांची नावं आहेत.

Prashant Patil

नाशिक : पुणे येथील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजे असताना नाशिकमध्ये देखील गंगापूर रोड येथे भक्ती गुजराती या महिलेनं सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी गुन्ह्यातील तिघही आरोपींना गुजरात येथून अटक केली आहे. भक्ती गुजराती तिचे पती अथर्व गुजराती, सासरे योगेश गुजराती, सासू मधुरा गुजराथी या अटक केलेल्या तिघांची नावं असून या तिघांना न्यायालयात हजर केलं असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. गंगापूर पोलीस यासंदर्भात पुढील तपास करत असून या तिघांना नाशिकच्या क्राईम ब्रँचकडून अटक करत गंगापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.

नेमकी घटना काय?

नाशिकच्या गंगापूर परिसरात एका विवाहितेनं आत्महत्या केली आहे. सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेनं राहत्या घरीच गळफास घेऊन जीवन प्रवास थांबवला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पती आणि सासरच्या मंडळींविरोधात गु्न्हा दाखल केला.

आत्महत्येची घटना नाशिकच्या गंगापूर रोडवरील उच्चभ्रू वसाहतीत घडली आहे. भक्ती अथर्व गुजराथी (वय ३७) असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. भक्ती यांचा अथर्व यांच्याशी ७ वर्षांपूर्वी प्रेम विवाह झाला होता. त्यांना ५ वर्षांचा एक मुलगा देखील आहे. लग्नानंतर सासरच्या लोकांकडून भक्ती यांचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता, असा आरोप त्यांच्या वडिलांनी केला.

सासरी त्रास दिला जात असल्यानं भक्तीच्या कुटुंबियांनी तिला माहेरी आणलं होतं. पण अथर्वनं तिला पुन्हा सासरी नेलं. पण सासरच्या लोकांकडून सुरु असलेला त्रास कायम राहिला. या जाचाला कंटाळून भक्तीनं राहत्या घरात गळफास घेऊन आयुष्याचा शेवट केला. या घटनेनंतर भक्तीच्या आई, वडिलांनी गुजराथी कुटुंबाविरोधात पोलीस तक्रार नोंदवली. अथर्वसह त्याच्या कुटुंबावर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajasthan Plane Crash: राजस्थानमध्ये लढाऊ विमान कोसळलं, पायलटचा मृत्यू; पाहा अपघाताचा थरारक VIDEO

Maharashtra Live News Update वर्धा जिल्ह्यात पावसाची संततधार सुरुच

Mumbai Rain : गरज असल्यासच घराबाहेर पडा; मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज |VIDEO

Caffeine Skin Effects : कॉफी प्यायल्याने स्कीन खराब होते का?

Car Models: 'या' कार मॉडेल्स डोंगराळ रस्त्यांवरही देतात जबरदस्त परफॉर्मन्स, किंमत स्पोर्ट्स बाईकपेक्षा कमी

SCROLL FOR NEXT