Bhiwandi Crime News saam Digital
क्राईम

Bhiwandi Crime News : भिवंडीत अल्पवयीन मुलाची हत्या, दाेघांना अटक

माझ्या मुलाची हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी युवकाच्या आईने केली.

Siddharth Latkar

- फय्याज शेख

Bhiwandi News :

भिवंडी शहरातील पूर्ववैमनस्यातून एका मुलाची हत्या करून मृतदेह काल्हेर येथील खाडीकिनारी निर्जनस्थळी गाडून पुरावा नष्ट केल्याची घटना उघडकीस आली आहे .या प्रकरणी दोघा युवकांना नारपोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. योगेश रवि शर्मा (yogesh ravi sharma) असे हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. (Maharashtra News)

पाेलीसांनी दिलेल्या माहितीनूसार काल्हेर येथील आशापुरा कॉम्प्लेक्स या भागात राहणारा योगेश शर्मा याला 25 नोव्हेंबरला सायंकाळी काही मित्रांनी काल्हेर येथील रेतीबंदर येथे मद्यपानासाठी येत असल्याचे सांगत तेथे चकणा घेऊन ये असे सांगितले.

त्यानंतर योगेश घरातून गेला तो परत आलाच नाही. या प्रकरणी कुटुंबीयांनी मुलाचा शोध घेऊन ही न सापडल्याने नारपोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली असता पोलिसांनी योगेश अल्पवयीन असल्याने अज्ञातां विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.

या घटनेचे गांभीर्य पाहून नारपोली पोलिसांनी तपास केला. योगेश यापूर्वी राहत असलेल्या कामतघर ब्रह्मानंद नगर येथील काही युवकांसोबत सहा महिन्यापूर्वी वाद झाला होता. त्या पूर्ववैमनस्यातून अपहरण झाले असल्याचा संशय त्याच्या कुटुंबीयांनी पाेलीसांकडे व्यक्त केला होता.

पोलिसांनी ब्रह्मानंद नगर कामतघर परिसरातून आयुश विरेंद्र झा (वय 19) व मनोज नारायण टोपे (वय 19) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी योगेशची धारदार हत्याराने वार करून डोक्यात दगड मारून हत्या केल्याची कबुली दिली. त्याचा मृतदेह काल्हेर रेतीबंदर येथील निर्जन गवताच्या ठिकाणी पुरून ठेवल्याचे सांगितले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नारपोली पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह बाहेर काढून ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना केला. याप्रकरणी नारपोली पोलिसांनी आयुश विरेंद्र झा व मनोज नारायण टोपे यांना अटक केली आहे. या हत्येच्या गुन्ह्यात अजून चार जण असल्याचा संशय पाेलीसांना आहे.

त्यांना फाशीची शिक्षा द्या : आईची मागणी

सहा महिन्यापूर्वी ब्रह्मानंदनगर येथे माझ्या मुलासोबत भांडण झाले होते. त्या रागातून माझ्या मुलाची हत्या झाली आहे असा आरोप मृतक योगेशची आई कुसुम यांनी साम टीव्हशी बाेलताना केला. माझ्या मुलाची हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pawar vs Pawar : 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढत, मतदानाच्या दिवशीच रोहित पवारांचे संकेत

आरोग्य यंत्रणेचा 'डेड रिपोर्ट'! 108 नंबरला क़ॉल, अ‍ॅम्ब्युलन्स 40 मिनिट लेट, रुग्णाचा मृत्यू

Bhandara Accident : लग्न लावून गावाकडे परतणाऱ्या वऱ्हाड्यांवर काळाचा घाला; ५ ठार, २ गंभीर

आमदार गायकवाडांच्या गुंडगिरीला पुन्हा ऊत, पानसरेंच्या पुस्तकावरून गायकवाडांची 'बॉक्सिंग'

IPL 2026 : संजूचा पॉवर पंच! वानखेडेवर ठोकलं शतक, मुंबईच्या गोलंदाजांची केली धुलाई

SCROLL FOR NEXT