Mangesh Kashikar news, Shiv Sena Nagpur molestation case 
क्राईम

Nagpur Crime : नागपूर हादरले! शिंदेसेनेच्या शहर संपर्कप्रमुखावर विनयभंगाचा गुन्हा

Nagpur Shiv Sena Mangesh Kashikar molestation case : शिंदे गटाच्या शिवसेनेचे नागपूर शहरप्रमुख मंगेश काशीकर यांच्याविरुद्ध विनयभंग आणि दीड कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल. महिला उद्योजिकेच्या तक्रारीनंतर बजाज नगर पोलिसांनी कारवाई केली आहे.

Namdeo Kumbhar

Nagpur leader fraud case : शिंदे गटाच्या शिवसेनेचे नागपूर शहर संपर्कप्रमुख मंगेश काशीकर यांच्याविरुद्ध बजाज नगर पोलीस ठाण्यात विनयभंग आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय. नागपूरमधील एका महिला उद्योजिकेच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली. काशीकर यांनी दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप महिलेने तक्रारीत केला आहे. या प्रकारानंतर काशीकर यांना पदावरून काढून टाकण्याची मागणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. नागपूरमध्ये शिवसेना वाढवण्यात काशीकर यांचा मोठा वाटा आहे.

मंगेश काशीकर यांचे बजाज नगर परिसरात एक हॉटेल आहे. दीड वर्षांपूर्वी त्यांनी हे हॉटेल नफ्याच्या १० टक्के रकमेवर तक्रारदार महिलेला चालवण्यास दिले होते. महिलेने दीड कोटी रुपयांचे कर्ज काढून हॉटेलचे नूतनीकरण केले आणि व्यवसाय सुरू केला. काही महिन्यांनंतर काशीकर यांनी नफ्याची रक्कम वाढवण्याची मागणी केली होती. त्यानंतर दोघांमध्ये वादावादी झाली. या वादादरम्यान काशीकर यांनी महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप तक्रारीत आहे. यानंतर महिलेने बजाज नगर पोलीस ठाण्यात काशीकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी काशीकर यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. बजाजनगर पोलिसांकडून याप्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणाने नागपूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेने अद्याप याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. दुसरीकडे, स्थानिक शिवसैनिकांमध्येही या घटनेबाबत नाराजी व्यक्त होत आहे. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीची सखोल चौकशी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच काशीकर यांना अटक होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ढगांच्या गडगटासह मुंबई उपनगरात जोरदार पाऊस

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

Main Entrance Vastu Tips : घराच्या दरवाज्याजवळ चुकूनही 5 गोष्टी ठेवू नका; सकारात्मक ऊर्जा दूर राहील

Sangli Tourism : सांगलीत ५ विरंगुळ्याची ठिकाणे, पाऊल ठेवताच मन आपोआप होईल फ्रेश

तुकाराम मुंढेंचं आता थेट FDAमध्येच सर्जिकल स्ट्राइक; 15 अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT