Nagpur police arrest man who threatened to bomb Katol police station and police quarters. saam tv
क्राईम

Nagpur Police Bomb Treat: बॉम्बच्या धमकीनं नागपुरात खळबळ; अटक केली म्हणून पोलीस स्टेशन उडवण्याची धमकी

Police Station Bomb Threat: पोलीस हेल्पलाइन ११२वर कॉल करून काटोल पोलीस स्टेशन आणि पोलीस वसाहत उडवून देण्याची धमकी आली होती. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केलीय. काही महिन्यांपूर्वी काटोल पोलिसांनी एकाला अटक केली होती.

Bharat Jadhav

नागपूरमधील काटोल पोलीस स्टेशनला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली.

धमकीचा कॉल पोलीस हेल्पलाइन ११२वर करण्यात आला.

आरोपी चेतन रामदास बानाईत याला पोलिसांनी अटक केली.

पराग ढोबळे, साम प्रतिनिधी

पोलीस हेल्पलाइन नंबर ११२वर पोलीस स्टेशन आणि पोलीस वसाहत उडवून देण्याची धमकी आली. बॉम्बने उडवून देण्याच्या धमकी आल्यानंतर खळबळ माजली होती. धमकीच्या कॉल आल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत धमकी देणाऱ्याला एकाला काटोल पोलिसांनी अटक केलीय. चेतन रामदास बानाईत, असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

३२ वर्षीय चेतन याने नागपूर जिल्ह्यातील काटोल पोलीस स्टेशन तसेच नागपूर ग्रामीण पोलीस वसाहत बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती. आरोपीची चौकशी केल्यानंतर त्याने धक्कादायक खुलासा केला. चेतनने मंगळवारी रात्री पोलीस हेल्पलाइन नंबर ११२ वर दोनदा कॉल केला. दोन्ही फोन कॉलवर त्याने वेगवेगळी धमकी दिली.

पहिल्या फोन कॉलवर त्याने काटोल पोलीस स्टेशन उडवून देण्याची धमकी दिली. तर दुसऱ्या फोनवर नागपूर ग्रामीण पोलीस वसाहत बॉम्बने उडून देण्याची धमकी दिली होती. त्यानंतर काटोल पोलिसांनी लागलीच त्याचा शोध घेत त्याला ताब्यात घेतलं.

का दिली धमकी

मागील महिन्यात काटोल पोलिसांनी चेतनला अमली पदार्थ सेवन केल्यामुळे अटक केली होती. त्याचा राग मनात धरत त्याने फोन कॉल करत बॉम्बची धमकी दिली. मंगळवार रात्री ११२ वर संपर्क करत त्याने चक्क पोलीस स्टेशन उडवून देण्याची धमकी दिली. त्यानंतर पोलीस वसाहत उडवण्याची धमकी दिली होती.

डॉक्टरचं नर्ससोबत अनैतिक संबंध, भुलीचं इंजेक्शन दिलं अन्

उत्तर प्रदेशातील बरेली येथे अवैध संबंध लपवण्यासाठी डॉक्टरनं नर्सला भुलीचं इंजेक्शन दिले नंतर तिला गाडीनं चिरडून मारण्याचा प्रयत्न केला. गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी डॉक्टरला बेड्या ठोकल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देवाभाऊंनी शेतकऱ्यांचं ऐकलं! लातूरमधून मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Raj Thackeray : जाहिरातबाजी महाराष्ट्राची संस्कृती नव्हे, बळीराजाचं कुटुंब पुन्हा उभं करा; राज ठाकरेंचं CM फडणवीसांना खुलं पत्र

Maharashtra Live News Update: अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली पूरग्रस्त गावांची पाहणी

Thursday Horoscope: चांगल्या कर्माचे फळ, चांगलेच मिळते, ४ राशींचा गुरुवार जाणार खास; वाचा राशीभविष्य

Viral Love Story : लेडी बॉसचं प्रेम ३.७३ कोटींचं! कर्मचाऱ्यातच जीव गुंतला; घटस्फोट घडवला, आता स्वतःच चढली कोर्टाची पायरी

SCROLL FOR NEXT