Nagpur Hit And Run Case 
क्राईम

Nagpur Hit And Run Case : हिट अँड रन प्रकरणात धक्कादायक खुलासा; सासऱ्याच्या कोट्यवधींच्या संपत्तीवर सूनेचा डोळा, ड्रायव्हरला सुपारी

Nagpur Hit And Run Case : मे महिन्यात नागपूरमधील बालाजी नगर परिसरात हिट अँड रनची घटना घडली होती. याप्रकरणाच्या पोलीस तपासात मोठी धक्कादायक बाब समोर आलीय. सासऱ्याची संपत्ती हडपण्यासाठी सूनेनेच घातपात घडवून आल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

Bharat Jadhav

पराग ढोबळे, साम प्रतिनिधी

नागपुरात घडलेल्या हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेटसमोर आलीय. २२ कोटी रुपयांच्या संपत्तीसाठी सूनेनेच सासऱ्याच्या हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात समोर आलीय. याप्रकरणातील आरोपी सूनेसह ३ जणांना अटक करण्यात आलीय. विशेष म्हणजे हत्येचा कट रचणारी सून ही गडचिरोली जिल्ह्यात सरकारी नोकरीवर कार्यरत आहे.

नागपूरच्या बालाजी नगर परिसरात २२ मे रोजी हिट अँड रनची घटना घडली होती. यात पुरुषोत्तम पुट्टेवार नावाचे व्यक्तीचा मृत्यू झाला होता. पुरुषोत्तम पुट्टेवार यांना एका कारने चिरडलं होतं. नागपूर पोलिसांनी या हिट अँड रन प्रकरणाचा तपास सुरू केला. या तपासात एक धक्कादायक बाब समोर आली. हा रस्ते अपघात नसून सुपारी देऊन हा घातपात घडवण्यात आल्याचं वास्तव पोलिसांच्या तपासात समोर आलं होतं.

याप्रकरणी पोलिसांनी पुट्टेवार यांच्या सूनेला अर्चना पुट्टेवार हिला अटक केलीय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुट्टेवार यांच्या ३०० कोटी रुपयांच्या संपत्तीवर सूनेचा डोळा होता. ही संपत्ती हडपण्यासाठी अर्चना हिने पतीच्या कार चालकाला हाताशी धरलं. त्याला सासरे पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या हत्येची सुपारी दिली. पुरुषोत्तम यांच्या हत्येसाठी अर्चनाने चालकाला १ कोटी रुपयांची सुपारी दिली होती. अर्चनाने हत्येपूर्वी चालकाला १७ लाख रुपये दिले होते.

दरम्यान अर्चना पुट्टेवारी हिने तिच्या सासऱ्यांच्या हत्येचा तीनवेळा प्रयत्न केला. पहिला प्रयत्न हा ८ मे रोजी झाला होता. त्यानंतर दुसरा प्रयत्न १६ मे रोजी झाला. तिसरा प्रयत्न हा २२ मे रोजी झाला या तिसऱ्या प्रयत्नात पुरुषोत्तम पुट्टेवार यांना कारने पाठीमागून धडक दिली. धडक लागल्यानंतर पुरुषोत्तम हे कारखाली आले त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026 Mi vs RR: हार्दिक, रोहितसह सूर्यादादाही फेल; राजस्थान रॉयल्सकडून मुंबईचा दारूण पराभव

US-Iran War: अमेरिका इराणवर अणुबॉम्ब टाकणार? ट्रम्प यांचा बेचिराख करण्याचा प्लॅन?

PSL मध्ये मोठी दुर्घटना! फलंदाजानं मारलेला फटका आला जिवाशी; डोक्याला चेंडू लागताच खेळाडू मैदानावर कोसळला

Nagpur : संघ मुख्यालयाजवळ स्फोटकं, 15 जिलेटिन कांड्या, 58 डिटोनेटर जप्त

ओव्हरटेकच्या नादात जीव गेला; बसखाली चिरडून दोघांचा मृत्यू, अपघाताचा थरार CCTVमध्ये कैद

SCROLL FOR NEXT