Nagpur Crime saam Tv
क्राईम

Nagpur Crime: नागपूरची कायदा सुव्यवस्था धाब्यावर; भरदिवसा तडीपार आरोपीचा खून, १५ दिवसात हत्येची ९ वी घटना

Nagpur Crime : नागपूर शहरातील अजनी पोलीस स्टेशन हद्दीतील परिसरात एका तडीपार आरोपीची हत्या झालीय. गेल्या १५ दिवसात हत्येच्या ९ घटना घडल्या आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(पराग ढोबळे, नागपूर)

Nagpur Crime :

नागपूर शहरात भरदिवसा तडीपार आरोपीची हत्या झाल्याची घटना घडलीय. अजनी पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या नाईक नगर भागात ही घटना घडलीय. नागपूरमध्ये गुन्हेगारी वाढू लागली असून गेल्या पंधरा दिवसांमध्ये हत्येची ही ९ वी घटना आहे. यामुळे शहरातील सुरक्षेविषयी प्रश्न उपस्थित होत आहे.(Latest News)

मिळालेल्या माहितीनुसार, हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव मृतक सूरज उर्फ ​​बिहारी महतो असून तो तडीपार होता. सूरजची विपीन कुमार गुप्ता नावाच्या व्यक्तीने हत्या केलीय. विपीन कुमार गुप्ता यावर सुद्धा खुनाचा आरोप होता. सूरजची हत्या केल्यानंतर पोलिसांन आरोपीला अटक केलीय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आज सूरज हा काही कामानिमित्त नाईक नगर येथे गेला होता. जेथे आरोपीचे विपीनकुमार गुप्तासोबत भांडण झालं होतं. यावेळी दोघेही समोरासमोर आले आणि त्याचा वाद विकोपाला गेला. त्यांच्या झालेल्या वादाचे मारहाणीत रुपांतर झालं. सुरज स्वतःचा बचावासाठी एका घरात घुसला तेव्हा त्याचा पाठलाग करत विपीनने त्याचावर धारधार शास्त्राने वार करत सूरजचा खून केला.

घटनेनंतर आरोपीला अटक करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहे. तसेच विपीनच्या दोन साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत. यात तडीपार आरोपी हा शहारत फिरतोय यात त्याचा खून होतो, ही बाब पाहता नक्कीच पोलीस विभागाच सुरक्षेकडे दुर्लक्ष असल्याचं दिसून येत आहे.

खुनाच्या तीन मोठ्या घटना

नागपूर शहरात मागील काही दिवसांपासून चोरी, धमकी, खंडणी या घटनांबरोबरच खूनाच्या घटना देखील पाहायला मिळत आहे. नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीतही हत्येची घटना घडली होती. उधार पैसे परत देत नसल्याच्या कारणावरून दोन जणांमध्ये वाद झाला होता. मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव नीरज शंकर भोयर ( वय २८ ) असं होतं.

दुसरी घटना नंदनवन पोलिसांच्या हद्दीतील कुंभार टोली परिसरात घडलीय. वाहतूक दाराकडून चालक गैरहजर राहत असल्याने खून झाल्याची घटना घडली होती. सचिन उईके, असं मृतकाचं नाव होतं. तिसरी घटना कळमना पोलीस हद्दीत घडली होती. क्रिकेट खेळत असताना वाद झाला आणि वाद विकोपाला जाऊन खूनाची घटना घडली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्याच्या भेटी होईना; अडचणी कोणी विचारेना, कार्यकर्त्यांना भासतेय अजितदादांची कमी

धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात! ट्रॅव्हल्स बस पलटी, 6 प्रवासी जखमी

कार चालवताना अचानक उघडली 'एअर बॅग', एअर बॅगमुळे 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

स्मार्ट मीटरचा झटका, ग्राहकांना लाखाचा फटका, सोलरधारकांना 20 पटीनं वीजबिल, महावितरणचं स्मार्ट मीटर की स्मार्ट लूट?

NEET नंतर TET चा पेपरही फुटला, 28 जूनची TET परिक्षा रद्द, भिवंडीतील पेपरफुटीचं हरियाणा-बिहार कनेक्शन

SCROLL FOR NEXT