Nagpur Crime  Saam Tv
क्राईम

Nagpur Crime News: देहव्यापाराचं रॅकेट चालवणाऱ्या बाप-लेकासह ५ जणांना अटक, अल्पवयीन मुलींची सुटका

Minor Girl Prostitution Nagpur: नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलींकडून हॉटेलमध्ये देहव्यापार करवून घेतल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संबंधितांना अटक करण्यात आली आहे.

Rohini Gudaghe

Nagpur Crime Minor Girl Forced to Prostitution

काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये चालणाऱ्या वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश झाला होता. अशीच एक धक्कादायक घटना आता नागपूरमधून (Nagpur) समोर येत आहे. नागपूर शहरात एका हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलींकडून देहव्यापार करवून घेतल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आपण सविस्तर जाणून घेऊ या. (Latest Crime News)

नागपूरमध्ये हॉटेल मालक आणि त्याचा मुलगा अल्पवयीन मुलीकडून हॉटेलमध्ये देहव्यापार (Minor Girl Prostitution) करवून घेत होते. याप्रकरणी या बापलेकासह अन्य पाच जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मनीष नगरमध्ये हे हॉटेल होते. या हॉटेलवर गुन्हेशाखा युनिट ४ च्या पथकाने धाड (Crime news) घातली. तिथून मुलींची सुटका करीत याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय

हॉटेल मालक राकेश बलवीरसिंह चावला (वय ५५) आणि त्याचा मुलगा आशिष चावला (वय २७ रा. छत्रपती चौक) अशी आरोपी बापलेकाची नावे आहेत. मनीष नगरातील रेल्वे क्रॉसिंगजवळील हॉटेलमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वेश्याव्यवसाय सुरू होता. तिथे अल्पवयीन मुलींना ग्राहकांसाठी आणण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली (Nagpur Crime) होती.

हॉटेल मालक राकेश व आशिष चावला यांनी काही अल्पवयीन मुलींना देहव्यापारासाठी हॉटेलमध्ये (Nagpur Hotel) बोलवित होते. त्यांना या कामासाठी हॉटेल व्यवस्थापक धीरज खुळे(रा. राकेश लेआऊट बेलतरोडी), अलोक रैकवार (३४ रा. रमानगर, अजनी) आणि गजानन सोनवणे (४० रा. अमर संजय सोसायटी, मनीषनगर) हे तिघेजण मदत करत होते. ते हॉटेलमध्ये काम करत होते.

हॉटेलवर पोलीस पथकाचा छापा

या तिघांनी ८ ते १० तरुणी आणि अल्पवयीन मुलींना त्या हॉटेलमध्ये (Hotel) ठेवले होते. तिथे मुलींचं आर्थिक आणि लैंगिक शोषण केलं जात होतं. एसएसबी पथक देहव्यापाराच्या अड्ड्यांवर कारवाई करीत नाही, असं लक्षात येताच गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक श्याम सोनटक्के, अविनाश जायभाये, सहायक निरीक्षक अयुब संदे यांच्या पथकाने या हॉटेलवर छापा (Nagpur news) टाकला.

यावेळी पथकाने १५ वर्षाच्या मुलीला एका ग्राहकाच्या खोलीतून ताब्यात (Minor Girl Prostitution Nagpur) घेतले. पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

SCROLL FOR NEXT