Nagpur Crime News Friend killed friend  Saam Tv News
क्राईम

Nagpur Crime : क्षुल्लक कारणावरुन जीवलग मित्राला भोसकलं, धारदार शस्त्राने वार करुन संपवलं; नागपूर हादरलं

Nagpur Murder News : मोहन उर्फ बबलू मिश्रा आणि अभिषेक कांबळे हे एकाच परिसरात राहत असून चांगले मित्र आहे. त्यांच्यासोबत तीन मित्र होते. सर्वजण एकमेकांच्या ओळख परिचयातील आहेत.

Prashant Patil

नागपूर : नागपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवीगाळ केल्याच्या क्षुल्लक कारणावरून मित्राने आपल्या जिवलग मित्राची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली आहे. पारडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली असून मोहन उर्फ बबलू मिश्रा असं मृतकाचं नाव आहे. तर मुख्य आरोपी अभिषेक कांबळे यांच्यासह तीन आरोपींना पारडी पोलिसांनी अटक केली आहे.

मोहन उर्फ बबलू मिश्रा आणि अभिषेक कांबळे हे एकाच परिसरात राहत असून चांगले मित्र आहे. त्यांच्यासोबत तीन मित्र होते. सर्वजण एकमेकांच्या ओळख परिचयातील आहेत. पारडी पोलीस स्टेशन हद्दीत स्वागत नगर परिसरात रात्रीच्या सुमारास मोहन उर्फ बबलू मिश्रा आणि आरोपी अभिषेक कांबळे आणखी तीन मित्रांसोबत बसले होते. यावेळी शिवीगाळ केल्याचा कारणावरून वाद झाला. हा वाद विकोपाला जात आरोपी अभिषेक कांबळे याने मोहन उर्फ बबलू मिश्रा याच्यावर धारदार शस्त्रानं वार केले. यात यावेळी रक्तस्राव होऊन मोहन उर्फ बबलू मिश्राचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी यामध्ये चार आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

अभिषेक कांबळे याच्यावर यापूर्वीही मारण्याचे गंभीर गुन्हे दाखल होते. तो मागील एक वर्षापासून पुण्यात एका कंपनीत काम करत होता. तिथे एक महिन्याचा ब्रेक असल्यामुळे तो नागपुरात आला होता. याचदरम्यान मृतक मोहनने त्याला डिवचलं आणि यात शिवीगाळ दिल्यावरून वाद झाला, आणि हा वाद विकोपाला जाऊन ही घटना घडलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Covid-19 Death : भारतात पुन्हा कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची एन्ट्री, ४६ वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू

Maharashtra News Live Update: नगरसेवक रमेश म्हात्रेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

Local Train Update : नालासोपारा-वसईत ट्रॅकवर पाणी साचण्याची कटकट संपणार, रेल्वेने घेतला 'हा' मोठा निर्णय

Filmmaker Death: प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांचे ५७ व्या वर्षी निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

Relationship Tips: पार्टनर फक्त 'टाईम पास' करतो? 'या' 7 संकेतांवरून ओळखा मनातील खोट

SCROLL FOR NEXT