Nagpur Latest News Saamtv
क्राईम

Nagpur Crime: आधी हेरायचा मग डाव साधायचा... पठ्ठ्याने ९ जिल्ह्यातून तब्बल १११ दुचाकी चोरल्या; कारनामा ऐकून पोलिसही चक्रावले

Nagpur Latest News: 24 वर्षांच्या अट्टल दुचाकी चोरट्याने दोन वर्षात तब्बल १११ गाड्या चोरुन नवीन विक्रमच रचला आहे. याबाबत पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी पत्रकार परिषदेत घेत सविस्तर माहिती दिली.

Gangappa Pujari

पराग ढोबळे, नागपूर|ता. ८ फेब्रुवारी २०२४

Nagpur Crime News:

नागपूर गुन्हे शाखा पोलिसांनी एक मोठी कारवाई करत 111 बाईक विदर्भातील नऊ जिल्ह्यातून एका सराईत दुचाईक चोराला अटक केली आहे आहे. 24 वर्षांच्या अट्टल दुचाकी चोरट्याने दोन वर्षात तब्बल १११ गाड्या चोरुन नवीन विक्रमच रचला आहे. याबाबत पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी पत्रकार परिषदेत घेत सविस्तर माहिती दिली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नागपूरमध्ये (Nagpur) एका चोरट्याने दोन वर्षात तब्बल १११ गाड्या चोरुन नवा विक्रम रचला आहे. ललित भोगे असं चोरट्यांच नाव असून तो कोंढाळीचा रहिवासी आहे. हा गुन्हेगार फक्त 24 वर्षांचा ललितवर इतर कुठलेही गुन्हे दाखल नाही. मात्र बाईक चोरीमध्ये मोठे गुन्हेगार त्याच्यासमोर फेल असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

या ललित भोगेने ललितने नागपूर, नागपूर ग्रामीण, अमरावती ग्रामीण, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, अकोला, भंडारा, गडचिरोली या नऊ जिल्ह्यांमध्ये गाड्यांची चोरी केली. सर्वप्रथम तो गाड्या हेरायचा. सोसायटींची पार्किंग लॉट, बँकेबाहेरील गाड्या यावर तो पाळत ठेवायचा आणि गाड्या लंपास करायचा.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या चोरी केलेल्या दुचाकी तो ग्रामीण भागात विकत होता. विकत घेणाऱ्यांना तो कागदपत्रे दोन महिन्यात देतो म्हणून सांगायचा. मात्र त्याने कधीच कोणाला कागदपत्रे दिली नाहीत. या चोराने तब्बल 77 लाख रुपये या चोरीच्या दुचाकी विकून मिळवले आहेत. दरम्यान, आरोपीने आणखी कुठे कुठे या चोरीच्या गाड्या विकल्या आहेत, नेमका त्याचा आकडा किती आहे, याबाबतचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT