Gangapur Crime News Gangapur Crime News
क्राईम

Crime News : खळबळजनक! प्रेमासाठी जिवलग मित्राला संपवलं, स्वत:च्या हत्येचा बनाव रचला; प्रियकर-प्रेयसी फरार!

Gangapur Crime News : गंगापूरमधील सिनेस्टाईल घटनेची छ. संभाजीनगरमध्ये चर्चा आहे. जिवलग मित्राला संपवून स्वत:च्या हत्येचा बनाव रचल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद.

Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : प्रेमात पडलेली व्यक्ती प्रेमासाठी काहीही करू शकते. काहीवेळा स्वत:चा जीव देऊ शकते पण प्रसंगी दुसऱ्याचा जीव घेण्यापर्यंतही मजल जाते, हे चित्रपटात आपण खूपवेळा पाहिले असेल. पण असाच काहीसा प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये घडल्याचे उघडकीस आलंय. प्रेमासाठी चक्क जवळच्या मित्राला संपवले अन् स्वत:च्या हत्येचा बनाव रचल्याची घटना गंगापूरमध्ये घडली. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली. किशोर रमेश बर्डे, असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी ७२ तासांत प्रियकर आणि प्रेयसीला बेड्या ठोकल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगरमध्ये मित्राला जाळून स्वतःच्या हत्येचा बनाव केल्याची घटना समोर आली आहे. प्रेयसीच्या कुटुंबाचा लग्नास विरोध, सतत जिवे मारण्याच्या धमक्यांमुळे प्रियकराने स्वत:च्याच हत्येचा बनाव रचला. जिवलग मित्राची क्रूर हत्या करून स्वत:च्या हत्येचा बनाव रचला. ओळख नष्ट करण्यासाठी त्याला जाळून प्रियकर-प्रेयसी पसार झाले. शनिवारी सारंगपूर शिवारात घडलेल्या या सिनेस्टाइल हत्येचा पोलिसांनी 72 तासांत उलगडा करत तिघांना अटक केली.

महेश रमेश माठे, त्याची प्रेयसी माधुरी चावरिया पिंपळे आणि किशोर रमेश बर्डे अशी मारेकऱ्यांची नावे आहेत. या तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गंगापूर तालुक्यातील सारंगपूरमध्ये शनिवारी तरुणाची क्रूरपणे हत्या करून जाळलेला मृतदेह आढळून आला. पोलिसांना पँटच्या खिशातील पाकिटात महेश ताठे नावाचे आधार, पॅनकार्ड, मोबाइल आढळला. परंतु मृतदेह काळजीपूर्वक पाहिल्यानंतर तो महेश नसल्याचे स्पष्ट झाले आणि हत्येचे गूढ आणखी वाढले होते. मात्र अधिक तपास केल्यानंतर पोलिसांना सिनेस्टाईल कहाणी समोर आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: महत्त्वाची बातमी! सोन्याच्या दरात मोठा बदल; २२ अन् २४ कॅरेटसाठी किती पैसे मोजावे लागणार? वाचा

Maharashtra Live News Update: पुढील चार दिवस राज्यात मेघ गर्जनेसह पाऊस

Honey Singh Case: हनी सिंगला कॉन्सर्टमध्ये घडलेल्या 'त्या' प्रकारावरुन मिळाली वॉर्निंग; पोलिसांनी केला गुन्हा दाखल

ओटीपी दिला आणि ओला कार लहान बहिणीला घेऊन निघाली अन् पुढं काय घडलं?

Ashok Kharat CA: पुण्यातील कोरेगाव पार्कात 18 रो हाऊस, 49 गुंठे जागा; अशोक खरातच्या सीएची संपत्ती ऐकून बसेल धक्का

SCROLL FOR NEXT