Mumbai Crime  Saam Tv
क्राईम

Mumbai Crime: तंबाखू न दिल्याचा राग, नंतर फोनवर मोठ्याने बोलत असल्याने तरुणाची सटकली; मित्राला इमारतीवरून ढकलून दिलं

Man Pushes Friend Off Building Over Loud Phone Call: मुंबईच्या कांदिवलीमध्ये एका तरुणाने आपल्या सहकारी मित्राला इमारतीवरून खाली ढकलून दिल्याची धक्कादायक घटना घडली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

Priya More

मोबाईलवर मोठ मोठ्याने बोलतो या रागातून एका तरुणाला त्याच्याच सहकाऱ्याने इमारतीवरून ढकलून दिल्याची धक्कादायक घटना मुंबईमध्ये घडली. मुंबईच्या कांदिवली परिसरात ही घटना घडली असून यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

कांदिवली पश्चिम परिसरात ही घटना घडली. मोबाईलवर मोठ्याने बोलतो यावरून जितेंद्र चौहान आणि अफसर जमीर उद्दीन आलम या दोन तरुणांमध्ये भांडण झाले. हे भांडण इतके विकोपाला गेले की अफसरने जितेंद्रला इमारतीवरून ढकलून दिलं. इमारतीवरून पडून गंभीर जखमी झालेल्या जितेंद्रचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे कांदिवलीमध्ये खळबळ उडाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांदिवलीतील साईबाबानगर येथे असलेल्या दैवी इटर्निटी या निर्माणाधिन इमारतीमध्ये ही घटना घडली. जितेंद्र आणि अफसर हे दोघे तरुण या इमारतीमध्ये काम करत होते. सीजी लाईफस्पेस कंपनीअंतर्गत जवळपास १२ ते १३ सुतार या इमारतीमध्ये काम करत होते. त्यांच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी एका व्यक्तीची नियुक्ती केली होती.

शनिवार कामगारांनी दिवसभराचे काम पूर्ण केले. त्यानंतर ते इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या मोकळ्या जागेवर बसून फोनवर आयपीएल पाहत होते. यावेळी आरोपी अफसरने जितेंद्रकडे तंबाखू मागितली. पण त्याने तंबाखू देण्यास नकार दिला. त्याचा अफसरला राग आला. त्यानंतर रात्री १० वाजता जितेंद्र फोनवर मोठ्याने बोलत होता. त्यामुळे अफसर चिडला. अफसरने जितेंद्रला जरा हळू बोल असे सांगितले. त्यावेळी दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. इतर कामगारांनी मध्यस्थी केली आणि वाद मिटवला.

पण काही वेळात हा वाद विकोपाला गेला. दुसऱ्या मजल्याच्या कडेला उभ्या राहिलेल्या जितेंद्रच्या दिशेने जाऊन अफसरने त्याला ढकलून दिले. दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्यामुळे जितेंद्रच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला ताबडतोब शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले पण डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषीत केले. या घटनेनंतर कांदिवली पोलिसांनी अफसरविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: अपघाताचा थरार! भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडलं; बापलेकीचा जागीच मृत्यू

Maharashtra Weather : गणेश विसर्जनाच्या दिवशी राज्यात कोसळधार, कोकणाला ऑरेंज अलर्ट; कुठे कसा पाऊस?

Budh-Mangal Yuti: 18 महिन्यांनी होणार बुध-मंगळचा दुर्मिळ संयोग; 'या' राशींचं भाग्य उजळणार

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात डेंगीचे 119 रूग्ण, मलेरियाचे 64 रूग्ण

Maiya Sanman Yojana: या राज्यातील महिलांना दर महिन्याला मिळतात ₹२५००; पैसे आले की नाही; असं करा चेक

SCROLL FOR NEXT