Mumbai Crime  Saam Tv
क्राईम

Crime: दारू पाजून हॉटेलमध्ये न्यायाची, शिक्षिकेने विद्यार्थ्यासोबत जबरदस्ती ठेवले शरीरसंबंध; मुंबई हादरली

Mumbai Crime: मुंबईतील एका नामांकित शाळेमध्ये भयंकर घटना घडली. इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षिकेने अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत जबरदस्ती शरीरसंबंध ठेवले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. आरोपी शिक्षिकेला पोलिसांनी अटक केली.

Priya More

मुंबईमध्ये शिक्षिकेने विद्यार्थ्यासोबत जबरदस्ती शरीरसंबंध ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील एका प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिकेने विद्यार्थ्यासोबत हे किळसवाणं कृत्य केले. अल्पवयीन मुलासोबत शरीरसंबंध ठेवल्याप्रकरणी या शिक्षिकेला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. दारू पाजून कधी कारमध्ये, कधी फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये या विद्यार्थ्यासोबत शिक्षिकेने शरीरसंबंध ठेवले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरापासून ही शिक्षिका या विद्यार्थ्यासोबत जबरदस्त शरीरसंबंध ठेवत होती. विद्यार्थ्याच्या आई-वडिलांना त्याच्या वागण्यात बदल जाणवला. त्यांनी त्याला याबाबत विचारले असता त्याने शिक्षिकेने केलेले भयानक कृत्य सांगितले. हे ऐकताच त्यांना मोठा धक्का बसला. विद्यार्थ्याचा रिझर्ल्ट लागण्यासाठी काही महिने बाकी होते त्यामुळे ते शांत राहिले. त्याच्या पालकांना वाटत होते की आरोपी शिक्षिका आपल्या मुलाचा पाठलाग सोडेल पण तसं झालं नाही.

विद्यार्थी याच वर्षी दहावी पास झाला. पण तो डिप्रेशनमध्ये गेला. शाळा संपल्यानंतर देखील शिक्षिका त्याला सोडत नव्हती. या शिक्षिकेने घरात काम करणाऱ्या नोकरच्या माध्यमातून या मुलाशी पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मला तुला भेटायचे आहे असे तिने या विद्यार्थ्याला सांगितले. त्यानंतर मुलाच्या पालकांनी पोलिस ठाण्यात धाव घेत शिक्षिकेविरोधात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करत तिला अटक केली.

शिक्षिकेचे वय ४० वर्षे आहे. तिचे लग्न झाले असून तिला मुलगा देखील आहे. ती शाळेमध्ये इंग्रजी शिकवते. डिसेंबर २०२३ मध्ये शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात एका डान्स ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थी या शिक्षिकेच्या संपर्कात आला होता. तेव्हाच ही शिक्षिका विद्यार्थ्याकडे आकर्षित झाली. जानेवारी २०२४ मध्ये या शिक्षिकेने पहिल्यांदा या विद्यार्थ्यासोबत शरीरसंबंध ठेवण्यास सुरूवात केली. विद्यार्थ्याने सुरूवातीला दूर राहण्याचा प्रयत्न केला. पण ही शिक्षिका दुसऱ्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्याच्याशी संपर्क करत होती. या प्रकरणी या विद्यार्थ्याच्या मित्राविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malvan Tourism : 'मालवण'मधील Hidden पिकनिक स्पॉट, पावसाळ्यात करा फुल टू धमाल

Yogesh Kadam : महाराष्ट्रात तुम्हाला मराठी बोलावंच लागेल, मराठी येत नसेल तर...; योगेश कदमांचा इशारा

Laxman Hake: भटक्या कुत्र्यासारखी हालत करू, महाराष्ट्रात फिरू देणार नाही; राष्ट्रवादी काँग्रेसचा लक्ष्मण हाकेंना इशारा

Shubman Gill double century : कॅप्टन असावा तर असा! शुभमन गिलनं इग्लंडला दमवलं, झळकावलं द्विशतक

Accident News: कार ६० फूट खोल ओढ्यात कोसळली, मुंबई-गोवा महामार्गावर थरारक घटना, पाहा,VIDEO

SCROLL FOR NEXT