Mumbai Crime  Saam Tv
क्राईम

Crime: कारमध्ये बसवून विद्यार्थ्याला अज्ञात स्थळी नेलं, कपडे काढायला सांगून...; शिक्षिकेचा खरा चेहरा कसा आला समोर?

Mumbai Crime: मुंबईतील एका नामांकित शाळेतील शिक्षिकेने विद्यार्थ्यासोबत जबरदस्ती शरीरसंबंध ठेवल्याची धक्कादायक घटना घडली. कधी कार तर कधी फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये ही शिक्षिका या विद्यार्थ्याला घेऊन जात होती. ही घटना कशी समोर आली वाचा सविस्तर...

Priya More

मुंबईतील एका नामांकित शाळेमध्ये भयंकर घटना घडली. एका शिक्षिकेने विद्यार्थ्याला जबरदस्ती शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. ही शिक्षिका या विद्यार्थ्याला इंग्रजी शिकवत होती. पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास सध्या मुंबई पोलिस करत आहेत. वर्षभरापासून ही शिक्षिका या विद्यार्थ्याचा छळ करत होती. ही सर्व भयंकर घटना आणि शिक्षिकेचा खरा चेहरा कसा समोर आला याची धक्कादायक माहिती समोर आली.

पोलिसांनी सांगितले की, ही शिक्षिका विद्यार्थ्याला एका वर्षापासून शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडत होती. ती या विद्यार्थ्याला आपल्या कारमध्ये बसवून अज्ञातस्थळी घेऊन जायची आणि त्याठिकाणी त्याला कपडे काढायला सांगून त्याच्यासोबत जबरदस्ती शरीरसंबंध ठेवत होती. अनेकदा तिने दारू पाजून या विद्यार्थ्याला ५ स्टार हॉटेलमध्ये घेऊन जाऊन त्याच्यासोबत शरीरसंबंध ठेवले.

विद्यार्थ्याच्या पालकांना त्याच्या वागण्यामध्ये बदल दिसून आला तेव्हा त्यांनी विश्वासात घेत त्याची विचारपूस केली. त्यावेळी त्याने आपल्या कुटुंबीयांना हे भयंकर प्रकरण सांगितले. या विद्यार्थ्याने शिक्षिकेसोबत दूर राहण्याचा प्रयत्न केला. पण तिने त्याला त्रास देणं थांबवले नाही. शिक्षिकेचे हे कृत्य पाहून विद्यार्थी खूपच अस्वस्थ राहू लागला. त्यावेळी ही शिक्षिका त्याला अँटी एन्जायटी पिल्स देत होती.

ही शिक्षिका पीडित विद्यार्थ्याला दक्षिण मुंबईव्यतिरिक्त वेगवेगळ्या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये घेऊन गेली होती. पोलिसांनी सांगितले की, शारीरिक संबंध ठेवण्यापूर्वी ही शिक्षिका या विद्यार्थ्याला दारू पाजत होती. कधी कार, कधी हॉटेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी या शिक्षिकेने विद्यार्थ्यासोबत जबरदस्ती शरीरसंबंध ठेवले. या शिक्षिकेविरोधात विद्यार्थ्याच्या पालकांनी केलेल्या तक्रारीनंतर तिच्याविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी तिला अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kargil Vijay Diwas: कारगिल युद्धाचे कोड नेम काय होते? प्रत्येक भारतीयाला या १० गोष्टी माहित असायला हव्यात

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात पावसाची रिपरिप; बळीराजा सुखावला

Shivali Parab: एकदम झक्कास! ‘हास्यजत्रा’ फेम शिवालीचे हटके फोटोशूट पाहिलंत का?

Maharashtra Politics: काँग्रेसला मोठा दणका; हा माजी आमदार भाजपच्या वाटेवर? VIDEO

Badam Shake : फक्त ५ मिनिटांत बनवा बदाम शेक, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT