Mumbai Police Child Trafficking racket 
क्राईम

Mumbai Crime : मातेनं सव्वा महिन्याच्या बाळाला विकले, मुंबई पोलिसांनी रॅकेट उद्ध्वस्त केले, ८ जणांना ठोकल्या बेड्या

Mumbai Police Child Trafficking racket : लहान बाळांची खरेदी विक्री करणाऱ्या आठ जणांना पोलिसांनी बेठ्या ठोकल्या आहेत. फक्त सव्वा महिन्याच्या बाळाची खरेदी विक्री केल्याची तक्रार आल्यानंतर पोलिसांकडून तात्काळ कारवाई करण्यात आली.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

संजय गडदे, साम टीव्ही प्रतिनिधी

Mumbai Child Trafficking : बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा माटुंगा पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला आहे.पोलिसांनी बालकांची विक्री करणाऱ्या दलालासह एकूण 8 आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सुलोचना सुरेश कांबळे, मिरा राजाराम यादव, योगेश सुरेश भोईर,रोशनी सोनटु घोष,संध्या अर्जुन राजपुत,मदिना उर्फ मुन्नी इमाम चव्हाण, तैनाज शाहिन चौहान,बेबी मोईनुद्यीन तांबोळी यांचा समावेश आहे. सर्व आरोपींना मा. न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 19 डिसेंबर पर्यंत सर्व आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील विक्री केलेल्या लहान मुलीस ताब्यात घेण्यात आलेले असून गुन्ह्याचा तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 11 डिसेंबर रोजी प्रमिला उत्तप्पा पवार या महिलेने माटुंगा पोलीस ठाण्यात तिची सून मनीषा सनी यादव हिने नुकत्याच जन्माला आलेल्या सव्वा महिन्याच्या मुलीला बेंगलोर येथे विकले असल्याची तक्रार दिली. या तक्रारीनुसार माटुंगा पोलिसांनी मनीषा सनी यादव आणि अन्य लोकांविरोधात कलम १४३(२), (३) (४) भा. न्या. सं सन २०२३ सह बालकांचे संरक्षण अल्पवयीन मुलांची (काळजी व संरक्षण) न्याय कायदा सन २०१५ चे कलम ८१ कलम ८१ अन्वये गुन्हा नोंद केला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी ताबडतोब मनीषा यादवीचा जबाब नोंदवला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-०४ यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेप्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांची पथके नेमण्यात आली.या पथकांनी तांत्रिक विश्लेषण व कौशल्यपुर्वक तपास करून उल्हासनगर, सुरत, वडोदरा व सिरसी, कर्नाटक येथे जावुन तपास केला. मनिषा सनी यादव हिला तिची सव्वा महिन्याची लहान मुलगी विकण्यास मदत करणारे पुरुष व महिला सुलोचना सुरेश कांबळे, (४५ वर्षे), २) मिरा राजाराम यादव, (४० वर्षे), ३) योगेश सुरेश भोईर,(३७ वर्षे),४) रोशनी सोनटु घोष, (३४ वर्षे), ५) संध्या अर्जुन राजपुत,(४८ वर्षे) ६) मदिना उर्फ मुन्नी इमाम चव्हाण, (४४ वर्षे), ७) तैनाज शाहिन चौहान, (१९ वर्षे) ८) बेबी मोईनुद्यीन तांबोळी, (५० वर्षे) यांना अटक केली. सर्व आरोपींना मा. न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्या सर्व आरोपींना १९/१२/२०२४ पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे. विक्री केलेल्या लहान मुलीस ताब्यात घेण्यात आलेले असुन गुन्हयाचा तपास माटुंगा पोलीस करत आहेत.

या गुन्ह्याचा छडा लावण्याचे काम मा. पोलीस आयुक्त, विवेक फणसाळकर, मा. विशेष पोलीस आयुक्त, देवेन भारती, मा. पोलीस सह आयुक्त (का व सु) सत्यनारायण, मा. अपर पोलीस आयुक्त, मध्य प्रादेशिक विभाग, अनिल पारसकर, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०४, रागसुधा आर, मा. सहा. पोलीस आयुक्त, माटुंगा विभाग, योगेश गावडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, माटुंगा पोलीस ठाणे राजेंद्र पवार यांचे मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक (गुन्हे), प्रतिभा जोगळेकर, पोलीस निरीक्षक (जनसंपर्क) केशव वाघ तसेच माटुंगा पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोउनि. माळी, विनोद पाटील व पोउनि प्रविण पाटील, सुनिल चव्हाण अॅन्टॉप हिल पोलीस ठाणेचे सपोनि पाटील, मदने, पोशि. बहादुरे, मपोशि. सोनाली भोपळे, मपोशि. अश्विनी शेंडकर, यांनी यशस्वीपणे पुर्ण केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha-OBC Quota Row: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात पोलिसात तक्रार दाखल; काय आहे कारण?

Chandra Grahan Tips : ग्रहणाच्या वेळी अन्न दूषित होऊ नये यासाठी सोपा उपाय

Anant Chaturdashi 2025 live updates : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणूक रथात विराजमान

Viral Video: शाळा आहे की मसाज पार्लर! शिक्षकाने विद्यार्थिनींकडून करून घेतली बॉडी मसाज, VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Aayush Komkar: शेवटी सूड घेतलाच! वनराजच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, अन् १ वर्षाने आयुष कोमकरची हत्या

SCROLL FOR NEXT