Virar passenger creates fake AC local pass using ChatGPT on Western Railway saam tv
क्राईम

ChatGPT scam : चॅटजीपीटीच्या मदतीने एसी लोकलचा बनावट पास तयार! विरारच्या प्रवाशाचा हायटेक प्रताप उघड

ChatGPT fake pass : मुंबईतील एका प्रवाशाने महिन्याभराच्या फर्स्ट क्लास पासचे एडिटिंग करून सहा महिन्यांचा एसी पास त्यामध्ये प्रवासाचा वर्ग, भाडे आणि वैधतेच्या तारखांमध्ये फेरफार असल्याचे निदर्शनात आल्यास प्रकार उघडकीस आला.

Saam Tv

AI वापर करून अनेक कामे सोपी झाली असली, तरी याच तंत्रज्ञानाचा गैरवापर करून फसवणुकीचे प्रकारही समोर येत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर उघडकीस आला आहे. ChatGPT च्या मदतीने डिजिटल रेल्वे पासमध्ये फेरफार करून एसी लोकलचा बनावट पास तयार करणाऱ्या विरारमधील एका प्रवाशाचा प्रताप तिकीट तपासणीदरम्यान उघडकीस आला आहे.

अमन ओमप्रकाश यादव असे या आरोपी प्रवाशाचे नाव आहे. त्याने एका महिन्याच्या फर्स्ट क्लास पासमधील माहिती एडिट करून त्याचे सहा महिन्यांच्या एसी लोकल पासमध्ये रूपांतर केल्याचा आरोप आहे. यासाठी त्याने ChatGPT चा वापर करून डिजिटल पासवरील प्रवासाचा वर्ग, भाडे आणि वैधतेच्या तारखांमध्ये बदल केला. हा बनावट पास ३ ऑक्टोबर २०२६ ते २ मार्च २०२७ या कालावधीसाठी वैध असल्याचे भासवण्यात आले होते. विरार ते बोरिवली या मार्गावर प्रवास करण्यासाठी त्याने हा पास तयार केला होता.

मात्र, वसई रोड आणि नायगाव स्थानकांदरम्यान सुरू असलेल्या तिकीट तपासणीवेळी हा प्रकार उघडकीस आला. तपासणीदरम्यान आरोपीने आपल्या मोबाईलमधील डिजिटल पास दाखवला. मात्र, मोबाईलमध्ये नेटवर्क नसतानाही त्याने तात्काळ पास दाखवल्याने तिकीट तपासनीसांना संशय आला. त्यानंतर रेल्वेच्या हँडहेल्ड टर्मिनलच्या साहाय्याने पासची पडताळणी करण्यात आली. यावेळी पासमधील माहिती आणि रेल्वेच्या अधिकृत नोंदी यांच्यात तफावत आढळून आली. त्यामुळे पास बनावट असल्याचे स्पष्ट झाले.

यानंतर पश्चिम रेल्वेच्या तिकीट तपासनीसांनी प्रवाशाला ताब्यात घेतले आणि पुढील कारवाईसाठी रेल्वे सुरक्षा दलाकडे (RPF) सोपवले. या प्रकरणी वसई रेल्वे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, डिजिटल पासमध्ये अशा प्रकारे फेरफार करून फसवणूक होऊ नये, यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासन सतर्क झाले आहे. डिजिटल पासची केवळ स्क्रीनवरील माहिती न पाहता बॅकएंड व्हेरिफिकेशनद्वारे पडताळणी करण्याचे निर्देश तिकीट तपासनीसांना देण्यात आले आहेत. AI च्या मदतीने बनावट पास तयार करण्याचा हा प्रकार रेल्वे प्रशासनासाठीही चिंतेचा विषय ठरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Water Cut: पनवेलकरांसाठी महत्वाची बातमी, ३६ तास पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या परिसरांना बसणार फटका?

Maharashtra News Live Update: रांजणगाव गणपती परिसरात भीषण अपघात

Shaktipeeth Highway: राज्य सरकारच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध; सत्ताधारी आमदारानेच घेतली विरोधाची भूमिका

Vande Bharat Train: आधी इडली अन् मेदुवडा, आता खा पुरणपोळी, 'वंदे भारत'च्या प्रवासादरम्यान मराठमोळ्या चवीची मेजवानी

Pune Crime : पुण्यात एटीएम फोडून २० लाख ३० हजारांची रोकड लंपास; सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर कलर स्प्रे मारून चोरट्याचा डल्ला

SCROLL FOR NEXT