Mumbai Crime news Saam tv
क्राईम

मुंबईत ५ कोटींची हेराफेरी; सोने-हिऱ्यांच्या व्यापाराच्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा?

Mumbai Crime news : मुंबईत ५ कोटींची हेराफेरी समोर आली आहे. सोने-हिऱ्यांच्या व्यापाराच्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे.

Saam Tv

मुंबईच्या कांदिवलीत सोने-हिऱ्यांच्या व्यापाराच्या नावाखाली फसवणूक

पीडितांकडून सराफ, पत्नी व कुटुंबीयांवर गंभीर आरोप

या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबईच्या कांदिवली परिसरात सोने-हिऱ्यांच्या व्यापाराच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. कांदिवलीत एका सराफाने त्याच्या पत्नी, वडील आणि इतर नातेवाईकांच्या मदतीने व्यावसायिकांना मोठ्या परताव्याचे आमिष दाखवं. त्यानंतर त्यांच्याकडून तब्बल ५.१० कोटी रुपये उकळल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कास्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांतिलाल मेहता, त्यांची पत्नी मुक्ता मेहता आणि कुटुंबीयांनी जानेवारी २०२३ मध्ये एका ५२ वर्षीय व्यापाऱ्याला त्यांच्या दागिन्यांच्या दुकानात बोलावले. त्यानंतर त्याला ऑनलाइन कमोडिटी ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीचा प्रस्ताव दिला. यावेळी दोघांनी नफ्याची आश्वासन दिले. सोने, चांदी आणि हिऱ्यांच्या व्यवहारातून साधारण ४० टक्के नफा मिळेल, असे आश्वासन दिलं.

सराफाच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून संबंधित व्यापारी आणि त्यांच्या दोन मित्रांनी मिळून ७० लाख रुपये रोख आणि ४.४० कोटी रुपयांचे सोने-हिऱ्यांचे दागिने गुंतवले. या प्रकरणात सुरुवातीच्या काळात व्यवहार सुरळीत असल्याचा भास निर्माण करण्यात आला. परंतु कालांतराने संपर्क टाळण्यात येऊ लागल्याने लागल्याने संशय बळावला.

सराफाकडे ऑक्टोबर २०२५ रोजी गुंतवणुकीचा हिशोब मागितला. त्यावेळी आरोपींकडून उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली. अखेर व्यापारी थेट दागिन्यांच्या दुकानात गेले. त्यानंतर आरोपींच्या वडिलांनी कौटुंबिक कारणे देऊन वेळकाढूपणा केला. फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पीडित व्यक्तीने पोलिसांत धाव घेतली.

या प्रकरणी आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३१६(२), ३५१ आणि ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या गुंतवणूकदारांची रक्कम आणि दागिन्यांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT