mumbai news  saam tv
क्राईम

Mumbai Crime: मुंबईत ड्रग्ज टोळीचा पर्दाफाश,पोलिसांनी उघडकीस आणली १३ कोटींची तस्करी

Mumbai Drug Bust: राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात ड्रग्सचे जाळे निर्माण झाले असून यामध्ये कोणाचा वरदहस्त आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Omkar Sonawane

मयूर राणे, साम टीव्ही

RCF पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर अमलीपदार्थ विक्री प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पोलिसांनी तब्बल १३ कोटी ३७ लाख ६० हजार रुपये किमतीचे सुमारे ६ किलो ६८८ ग्रॅम मेफेड्रोन MD ड्रग्स जप्त करत पाच आरोपींना अटक केली आहे.कारवाई दरम्यान रेहान शेख नावाच्या तरुणास MD ड्रग्सची विक्री करताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याकडून सुमारे साडे चार लाख रुपये किमतीचे MD जप्त करण्यात आले. पुढील चौकशीत त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी आणखी चार ड्रग विक्रेत्यांचा शोध घेऊन त्यांनाही अटक केली.

या पाचही आरोपींकडून मिळून तब्बल १३ कोटींपेक्षा अधिक किमतीचा MD ड्रग्स साठा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार ही एक मोठी ड्रग टोळी असण्याचा संशय असून, आणखी आरोपींचा शोध सुरू आहे.

दरम्यान कोट्यावधीचे हे ड्रग्स नेमके आले कोठून? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे

या कारवाईमुळे मुंबईतील अमलीपदार्थांच्या गैरव्यवहारावर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पुढील तपास सुरू आहे.

अहिल्यानगरमध्ये ही पोलिसांची ड्रग्स प्रकरणाची मोठी कारवाई

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात पोलिसानी मोठी 15 मे रोजी मोठी कारवाई केली होती. या कारवाईत तब्बल 13 कोटी 75 लाख रुपये किमतीचा ड्रग्सचा साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे नगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

राज्यात छुप्या पद्धतीने अमली पदार्थ तसेच ड्रग्सची तस्करी होत असल्याचे वारंवार समोर येत आहे. ही कारवाई श्रीरामपुर पोलिसांनी खंडाळा-दिघी रस्त्यावर रात्रीच्या सुमारास कारवाई केली होती. यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा साठा आढळून आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिंदेसेनेच्या नेत्यासह 7 जणांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल; राजकीय वर्तुळात खळबळ, नेमके प्रकरण काय?

वहिनीला मिळवण्यासाठी सख्ख्या भावाचा काटा; हत्या केल्यानंतरही चेहऱ्यावर हसू,'त्या' क्रूर कृत्याने पोलीसही चक्रावले

Maharashtra News Live Update: एकही खासदार कुठंही जाणार नाही, शिंदेगटाच्या नेत्याच्या दावा

Pune Crime: क्षुल्लक कारणांवरून वाद; पुण्यात रागाच्या भरात पतीनं पत्नीला संपवलं, दीड महिन्यांच्या चिमुकल्यापासून आईचं छत्र हरपलं

बीडमध्ये पुन्हा अपहरणाचा थरार; दिवसाढवळ्या तरुणाला कारमध्ये बसवून पळवलं, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

SCROLL FOR NEXT