Mumbai Crime  Saam Digital
क्राईम

Mumbai Crime : कारचा पाठलाग करत बलात्काराची धमकी, २४ तासांच्या आत आरोपी गजाआड, खारमध्ये खळबळ

bike rider for threatening physically abused To woman In Khar : मु्ंबई पोलिसांनी २४ तासाच्या आत एका तरूणाला अटक केलीय. त्याने ४९ वर्षीय महिलेला लैंगिक अत्याचाराची धमकी दिल्याचं समोर आलंय.

Rohini Gudaghe

मुंबई : मुंबईमधील वांद्रे येथील पाली हिल नाका परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. नो-एंट्री लेनमध्ये बाईक चालवताना २५ वर्षीय दुचाकीस्वाराला ४९ वर्षीय महिला ओरडली, यावर संतापलेल्या आरोपीने या महिलेला थेट लैंगिक अत्याचाराची धमकी दिली. ही घटना २३ ऑगस्ट रोजी घडली होती. या २५ वर्षीय तरूणाला पोलिसांनी २४ तासांच्या आत खारमधून अटक (Mumbai Crime News) केलीय.

४९ वर्षीय महिलेला दिली बलात्काराची धमकी

आरोपीचं नाव सागर गुजर असल्याचं समोर आलंय. तो खारमधील रहिवाशी असल्याची माहिती टाईम्स ऑफ इंडियाच्या हवाल्यानुसार मिळत आहे.पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा माग काढल्याची माहिती त्यांनी दिली (Crime News) आहे. सदर महिलेला धमकी दिल्यानंतर आरोपीने पळता पाय काढला होता.

नेमकं काय घडलं होतं?

शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी आरोपी अन् पीडित महिलेत वाद झाला होता.त्याने नो एन्ट्रीमध्ये गाडी चालवल्यामुळे ही महिला त्याला ओरडली होती. संतापलेल्या तरूणाने या महिलेच्या कारचा काही अंतरापर्यंत पाठलाग केला (threatening physically abused) होता. त्याने तिला अडवून बलात्काराची धमकी दिली होती. त्यामुळे महिलेने स्वत:चा बचाव करण्यासाठी १०० इमर्जन्सी हेल्पलाइन नंबर डायल केला होता. हे लक्षात येताच आरोपीने काढता पाय घेतला, अन् तो घटनास्थळावरून पसार झाला होता. परंतु सीसीटीव्ही फुटेजमुळे आरोपीला पकडणं पोलिसांसाठी सोपं झालं होतं.

दुचाकीस्वाराला ठोकल्या बेड्या

दिवसाढवळ्या रस्त्याच्या मध्यभागीच नव्हे तर वर्दळीच्या ठिकाणी अशी धमकी देण्याचा भयंकर प्रकार वांद्रेमध्ये घडला आहे. मला इतरांना पुढे येण्यास आणि भविष्यात अशा घटना घडू नये, म्हणून तक्रारी दाखल करण्यास प्रोत्साहित करायचं (Mumbai News) आहे, असं पीडित महिलेनं सांगितलं आहे. तत्पर कारवाई केल्याबद्दल या महिलेने पोलिसांचे आभार मानले आहेत. या घटनेमुळे वांद्रेमध्ये मोठी खळबळ उडाली होती. परंतु पोलिसांच्या तत्परतेमुळे आरोपीला २४ तासांच्या आत अटक झाल्याचं समोर आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aayush Komkar: क्लासवरून घरी येत होता, बेसमेंटमध्ये दोघांकडून अंदाधुंद गोळीबार; आयुष कोमकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट

Anant Chaturdashi 2025 live updates : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून हेल्पलाइन नंबर जारी

Maharashtra Live News Update: प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

BMC Recruitment: बृहन्मुंबई महानरपालिकेत नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

Mandarmani Beach : पर्यटकांना भुरळ घालणारा मंदारमणी बीच, पावसाळ्यात खुलते सौंदर्य

SCROLL FOR NEXT