Mumbai Police arrest Moinul Razzak Qureshi from Bihar in connection with the murder of his wife after a domestic dispute in Santacruz. Saam tv
क्राईम

Crime: कौटुंबिक वाद टोकाला भिडला; रागाच्या भरात पत्नीचा गळा आवळला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Mumbai Crime: मुंबईतील सांताक्रूझ पूर्व येथे घरगुती वादातून एका व्यक्तीने पत्नीची हत्या केल्याची घटना घडली आहे. आरोपी मोईनुल रज्जाक कुरेशीला मुंबई पोलिसांनी जलद तपासानंतर बिहारमधून अटक केली.

Bharat Jadhav

  • सांताक्रुझ पूर्व येथे कौटुंबिक वादातून पत्नीचा खून.

  • गुन्ह्यानंतर आरोपी बिहारला पळाला होता

  • पतीने रागाच्या भरात पत्नीचा गळा आवळून खून केला

संजय गडदे, साम प्रतिनिधी

सांताक्रुझ पूर्व येथील कालिना भागात महिलेच्या हत्येची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला बिहारमधून अटक केली आहे. आरोपीचे नाव मुईनुल रज्जाक कुरेशी (वय 30 वर्षे, रा. 124/9 शिवकृपा चाल, ओल्ड सीप्झ रोड, कदिवली, सांताक्रूज पूर्व, मुंबई) असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ ऑक्टोबर रोजी घडली होती. कौटुंबिक वादातून आरोपी पतीने पत्नी नसीमा (वय 31 वर्षे) हिच्यावर चाकूने वार करून तीला गंभीर जखमी केले होते. त्यानंतर तिचा गळा आवळून तिची हत्या केली. याप्रकरणी वाकोला पोलिस ठाण्यात गुन्हा क्र. 903/2024 कलम 307, 504, 323, 324 भा.दं.वि. अन्वये दाखल करण्यात आला होता. प्रकरण गंभीर स्वरूपाचे असल्याने मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट-9 कडून तपास सुरू करण्यात आला.

पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन अखेर त्याला बिहार राज्यात पकडले. आरोपीला मुंबईत आणून पुढील चौकशी सुरू आहे. या कारवाईत पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर, अतिरिक्त पोलिस आयुक्त लक्ष्मण गौतम, उपायुक्त विशाल ठाकूर, सहाय्यक पोलिस आयुक्त प्रशांत राजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही यशस्वी कारवाई केली. या अटकेमुळे पत्नीवर हल्ला करून फरार झालेल्या आरोपीचा शोध लावण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले असून स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या तत्पर कारवाईचे कौतुक केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मंत्री संजय राठोड यांना मातृशोक

MPSC Success Story: सलग १६ वेळा अपयश, शेवटी जिद्दीने क्रॅक केली MPSC; झाडू कामगार महिलेची लेक झाली क्लास १ अधिकारी

Delhi car Blast Live updates : दिल्लीतील स्फोटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील धार्मिक स्थळांना विशेष अलर्ट

Mangal Ast: 139 दिवस ग्रहांचा सेनापती मंगळ राहणार अस्त; 'या' राशींवर कोसळणार दुःखाचा डोंगर, अडचणीही वाढणार

Kalyan Crime: कल्याणमध्ये चाललंय काय? नशेखोर तरुणांचा हैदोस, मराठी बोलता आलं नाही; परप्रांतीयांना बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT